ईतर

पंढरपूरकरांचा एम.आय.डी.सी मंजूरी मागणीचा मार्ग होणार सुकर;पहा कसे

दोन आमदारांच्या पाठपुराव्याला लाभले मोठे यश

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

मंगळवेढा : भारताची दक्षिण काशी म्हणून नावलौकिक असणाऱ्या तिर्थक्षेत्र पंढरपूरला एम.आय.डी.सी.सारखा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून येथील बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा व येथील युवकांना रोजगार संधी यांना प्राप्त व्हावी यासाठी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक सदर एम.आय.डी. सी. मंजूर व्हावी यासाठी शासनदरबारी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. नुकतेच मंजुरी मागणीचे पत्र आमदार कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे.

पंढरपूर तालुक्याचा औद्योगिक व धोरणात्मक विकासाचा अनुशेष भरून निघाला पाहिजे याकरिता आ.समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी वेळोवेळी एम आय डी सी मागणीसाठी केंद्र व राज्य पातळीवर आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करून व संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांना भेटून पत्रव्यवहार करून या मंजुरीसाठी रेटा लावला होता. अखेर या मागणीला खूप मोठे यश मिळून अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंढरपूर शहर व शहराच्या लगत असणाऱ्या कासेगाव, वाखरी, लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर या निमशासकीय गावांची व पंढरपूर शहरची लोकसंख्या जवळपास २ लाखांच्या आसपास आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कानकोपऱ्याला व इतर राज्यांना जोडणारे अनेक राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, विविध पालखी मार्ग आणि एस. टी मार्गांनी पंढरपूर शहर जोडले गेले असल्यामुळे सदर एम.आय.डी.सी प्रकल्प उभा राहिल्यास येथे उत्पादित होणाऱ्या पक्क्या मालासाठी कच्च्या मालाची मागणी व पुरवठा करणे सोयीस्कर ठरणार आहे. उपलब्ध दळणवळण सुविधेमुळे येथील निर्माण झालेल्या उत्पादनासही मोठ्या शहरातील बाजारपेठां मध्ये खूप मोठा उठाव मिळणार आहे.

शिवाय शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा पंढरपूरने प्रगतीचा खूप मोठा मनोरा तयार केला आहे. आधुनिक युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान अवगत व्हावे यासाठी पंढरपूर येथे ४ अभियांत्रिकी महाविद्यालये, व इतर उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थातून अनेक तरुण – तरुणी कौशल्यपूरक ज्ञान घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व रोजगार यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेकांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. अशा पदवी संपादीत व इतर कौशल्यधारकांसाठी व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी पंढरपूर येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प हे खूप मोठे योगदान ठरणार आहे. कोणत्याही तालुक्याच्या औद्योगिक विकासासास चालना देण्यासाठी एम. आय. डी. सी सारखे प्रकल्प होणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे अशा विकासकार्यातून तालुक्याचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी मोठी बळकटी मिळणार असल्याचे आ. समाधान आवताडे व आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले आहे.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511                     Gmail-lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close