जवाद चक्रीवादळाबाबत मोठी बातमी;आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांना धोका हवामान खात्याचा अंदाज
राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पहा कोठे
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
मुंबई : आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना जवाद चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा व शेती पिकावर याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुर्वकिनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
उपसागरात जवाद नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं. आज हे चक्रीवादळ विशाखापट्टनम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकेल असं भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
त्यामुळे आंध्र आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ताशी ५० ते ५५ किमी ते १०० किमीपर्यंत वारे वाहिलं अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर बचाव कार्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आंध्र प्रदेश आणि ओडिशा मध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने किमान २४ रेल्वेच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
महाराष्ट्रात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
परिणामी महाराष्ट्रातल्या मुंबईसह कोकण,मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
जवाद चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात उत्तर भागात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.
राज्यात रविवारपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे. मात्र सकाळी आणि रात्री धुकं पडण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com