Businessईतर

फॅबटेक व धन्वंतरी ग्रुप ने सिटीस्कॅनचा केलेला प्रयत्न अभिनंदनीय- आ. शहाजी पाटील

सांगोला शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना होणार लाभ

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

सांगोला : फॅबटेक व धनवंतरी ग्रुप सांगोला शहर आणि ग्रामीण भागातील डॉक्टरांनी एकत्र येत आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील रुग्णांसाठी अद्ययावत मशनरीने सुसज्ज असलेले सिटी स्कॅन सेंटर सुरू केले आहे. ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

प्रारंभी आमदार शहाजीबापू पाटील व चंद्रकांत देशमुख यांच्या शुभ हस्ते फॅबटेक धन्वंतरी सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फॅबटेक उद्योगसमूहाचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, प्राध्यापक पी सी झपके, नगराध्यक्षा सौ राणीताई माने,पंचायत समिती सभापती सौ राणीताई कोळवले तसेच धनवंतरी ग्रुपचे सर्व डॉक्टर्स,मान्यवर नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले की मानवी शरीरामध्ये चेतना कोठून येते याचा शोध कोणी घेतला आहे का सध्या मेडिकल सायन्स वेगाने प्रगती करत आहे मानवी शरीर कसा बनला हे कोणीही सांगू शकत नाही परंतु स्थानिक व तालुक्यातील डॉक्टरांनी फॅबटेक सोबत नव्याने सुरू केलेल्या सिटीस्कॅन सेंटरमुळे ग्रामीण भागातील जनतेला व सांगोला शहरातील जनतेला या सिटीस्कॅन सेंटरचा मोठा लाभ होणार व ही अभिनंदनीय बाब आहे. डॉक्टरांनी आता अशाच प्रकारे याहीपेक्षा अत्याधुनिक असणाऱ्या विविध मशिनरी सांगोल्यात आणाव्यात व येथील रुग्णांना याच ठिकाणी तपासणी करून उपचार करावा आजपर्यंत तपासणीसाठी पंढरपूर व मिरज कडे रुग्ण जात होते परंतु आता सांगोल्यात तपासणी होणार असल्याने रुग्णांसाठी मोठी सोय या सिटीस्कॅन च्या माध्यमातून होणार आहे.

आणि ती कल्पना उदयास आली-भाऊसाहेब रुपनर
सुरुवातीला कोरोनाच्या पहिल्या लाटेला कोरणाची मोठी भीती रुग्णांच्या, नागरिकांच्या मनामध्ये होती दुसरा लाटेला मात्र परिस्थिती भयंकर झाली सांगोला हुन सिरीयस होणारे पेशंटला पंढरपूरला हलवण्याची वेळ येत होती. तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की सांगोला मध्ये आपले एक सिटी स्कॅन सेंटर असावे ज्यामुळे कोरोना सारख्या आजारातील स्कोर समजला जातो व त्याच्यावर योग्य उपचार केले जातात आणि मग डॉक्टर सुरज रुपनर यांनी पुढाकार घेऊन या फॅबटेक व धन्वंतरी ग्रुप सोबत जोडून आज ती कल्पना उदयास आली. सांगोला सारख्या ग्रामीण भागामध्ये सुरु केलेले सिटी स्कॅन सेंटर रूग्णांसाठी वरदायिनी ठरणार असून चांगल्या प्रकारे जर हे चालले तर या ही पेक्षा मोठे अद्ययावत मशिनरी व टेक्निशियन या ठिकाणी उभे करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत करून बोलताना डाॅ. सुरज रुपनर यांनी
सांगितले की अंबिका देवीच्या पावन नगरी मध्ये व माळरानावर फळ बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोला नगरीत नव्याने सुरू होणाऱ्या फॅबटेक धन्वंतरी सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन होत असल्याचा आनंद आहेच परंतु सांगोला परिसरातील रुग्णांना सिटीस्कॅन साठी आता बाहेरगांवी जावे लागणार नाही याचा आनंद फार मोठा आहे.
या सिटीस्कॅन तपासणी मध्ये विविध आजारावरील निदान केले जाईल यामध्ये मेंदूचे स्कॅन तसेच मेंदू मधील रक्तस्त्राव, मेंदूवरील सूज, डोक्यात झालेली इंन्जुरी व ब्लड बाबतच्या सर्व गोष्टी चे निदान होणार आहे. तसेच छातीचे स्कॅन करता येणार असून दम लागणे किंवा छातीमध्ये जर एखादी गाठ असेल तर त्याचे स्कॅन करून निदान करण्यात येते. पोटाचे विविध आजार व विकार असतील तर त्याचे देखील स्कॅन मध्ये निदान करता येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी रुग्णांना आवश्यक असणारी एच आर सि टी तपासणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे.
रुग्णांच्या विविध आजारावरील निदानाकरिता फॅबटेक धन्वंतरी सिटीस्कॅन सेंटर च्या माध्यमातून २४ तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी त्यांच्या आजारावरील निदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुरज रुपनर (एमडी, रेडिओलॉजिस्ट) यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. विजय बंडगर, डॉ. राजेंद्र जानकर, डॉ. शिवराज भोसले, डॉ. अमर जाधव, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, डॉ. रवींद्र देशमुख, डॉ. सैफून तांबोळी, डॉ. शिवाजीराव ढोबळे, डॉ. हनुमंत गावडे, डॉ. धनंजय गावडे,डॉक्टर विजय इंगवले, डॉ. जयराम पाटील, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. दत्तात्रेय ढाळे, डॉ. विवेक विभुते, डॉ. कैलास खांडेकर, डॉ. गणेश सपाटे, डॉ. भागवत बाबर, डॉ. विशाल बंडगर, डॉ. विजयसिंह माने, डॉ. शैलेंद्र देशमुख, डॉ. मनीषा सतीश साळुंके, डॉ. सुधाकर कांबळे,डॉ.अजिंक्य नष्टे, डॉ. महेश लिगाडे, डॉ. उत्तम फुले, डॉ. सौरभ काजळकर, बाळासाहेब बनसोडे सह र्व उपस्थित मान्यवरांनी फॅबटेक धन्वंतरी सिटीस्कॅन सेंटर च्या कार्याला शुभेच्छा देऊन रुग्णांसाठी सुरू केलेल्या या सेवा अविरतपणे चालावी असे सांगितले.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-               दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close