अखेर आरटीओच्या मध्यस्थीने जादा रक्कम न घेता पंढरपूर सोलापूर वाहतूक झाली सुरळीत
अक्कलकोट ची पुनरावृत्ती पंढरपूर-सोलापूर कडे होवू नये
लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर बस स्थानकातून खाजगी वाहनधारकांनी मनमानी कारभार करून वाहतूक थांबवली व प्रवाशांकडून जादा रक्कमेची मागणी केल्यामुळे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कुमार नरखडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना देऊन प्रवाशांच्या हिताचा निर्णय घेत वाहतूक पुन्हा सुरळीत करून दिली.
याबाबत अधिक माहिती अशी गेल्या कित्येक दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी ची सेवा ठप्प झाली असल्याने प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने खाजगी वाहतुकीस प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली यामुळे जरी प्रवाशाची थोडीसी गैरसोय दूर झाली असली तरी सद्या प्रवाशांना खाजगी वाहतुकीने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येणाऱ्या भाविकाची संख्या मोठी आहे शिवाय सोलापूर या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये, अत्याधुनिक रुग्णालये, व्यापार पेठ, सिव्हिल हॉस्पिटल, मोठया शिक्षण संस्था, विद्यापीठ, एम आय डी सी असल्याने पंढरपूर हुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गाची संख्या मोठी असल्याने व सद्या प्रवासाचे दुसरे साधन नसल्याने याचा फायदा घेत खाजगी वाहनधारक वाहणाच्या क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी बसवले जात होते व काही वाहन धारकांकडून जादा पैसे घेत असल्याचे दिसून आल्याने याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास तुम्हाला बसायचं नसेल तर दुसऱ्या गाडीने या असं सांगितलं जायचे परंतु प्रवाशांना कामानिमित्त प्रवास करणं क्रमप्राप्त असल्याने नाईलाजाने चेंगराचेंगरीत प्रवास करावा लागत आहे.
खाजगी वाहनधारक सरळ सांगतात विविध ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांना हप्ता द्यावा लागतो तसेच सोलापूर व पंढरपूर येथे गाडी भरण्यासाठी पैसे द्यावे लागतात यामुळे आम्ही जादा प्रवाशी भरतो यावेळी
प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष कुमार नरखडे म्हणाले
एवढे दिवस झाले पंढरपूर सोलापूर या मार्गांवर खाजगी वाहनाने प्रवास करतोय परंतु एवढ्या दिवसात कोणत्याही पोलिसांनी गाडी अडवून त्यांच्या कडून पैसे किंवा दंड घेतला आहे असं दिसून आलं नाही.
मात्र असे विविध कारणं सांगून जादा क्षमतेने प्रवाशी वाहतूक केली जात आहे. शिवाय जादा प्रवाशी भरले जात असल्याने कार्यवाही होवू नये यासाठी प्रवासाचा मार्ग बदलून प्रवाशांना त्याच्या इच्छित स्थळी न उतरविता कुठे ही उतरले जाते यामध्ये चालकात व प्रवाशांत वादावादी चे प्रकार होत आहेत. अशा जादा प्रवाशी वाहतुकीमुळेच अक्कलकोट रोड वर मागील काही दिवसापूर्वी अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची पुनरावृत्ती पंढरपूर सोलापूर मार्गांवर होऊ नये यासाठी सोलापूर येथे बस स्थानकातील ए टी एस शिंदे व आर टी ओ कार्यालयात सदरची वस्तुस्थिती सांगण्यात आली. त्यानंतर या मार्गांवरील वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने खाजगी वाहतूकदारानी लगेच पंढरपूर येथून सर्व प्रवाशी वाहतूक बंद करून प्रवाशांना वेठीस धरले होते. ही बाब लक्षात येताच लगेच आर टी ओ कार्यालय सोलापूर येथे दूरध्वनी वरून संपर्क करून प्रवाशाची गैरसोय होत असल्याबाबत सांगितलं असता तात्काळ यांची संबंधित विभागाने दखल घेऊन व वाहन धारकांशी चर्चा करून जादा प्रवाशी न बसविणे,जादा पैसे न घेणे व मास्क चा वापर करणे या अटीवर आज दुपार पासून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com