पंढरीत दुय्यम निबंधक अधिकार्याचा मनमानी कारभार सर्वसामान्य जनता वेठीस!
कामकाज थांबल्याने दस्त करणार्या नागरिकांचे झाले हाल!
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक वर्ग 1 च्या अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे अन् ऑफिसात घडलेल्या वादावादीचे प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार घडला..! या कार्यालयांमध्ये दस्त करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे झाले हाल!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की पंढरपूर तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक वर्ग 1 मध्ये आज दुपारच्या सुमारास दस्त करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती याच गर्दीच्या दरम्यान अधिकारी आणि दस्त लेखनिक त्यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला आणि कार्यालयातच पोलीस दाखल झाले हा वाद आपसात मिटला नसल्याने पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना देऊन कार्यालयातील कर्मचारी सोबत घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले
दरम्यान कार्यालयांमध्ये दस्त नोंद करण्यासाठी आलेले सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील काम बंद झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. अनेकांचे दस्त नंबर आलेले असतानाही लवकर काम उरकून जाण्याच्या घाईगडबडीत असलेल्यांना कार्यालयातील कामकाज बंद झाल्यामुळे ताटकळत थांबावे लागले.
शासन नियमाप्रमाणे सर्व कार्यालयाचे संगणक सर्व्हर हे वेळेतच सुरू राहते व कार्यालय वेळ संपताना संगणक सर्व्हर बंद पडते यानंतर दस्त नोंद करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा नोंदणीसाठी यावे लागते मात्र दुय्यम निबंधक वर्ग एक अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे आज सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागल्याचा अनुभव घ्यावा लागल्याने या प्रकाराची चर्चा तहसील परिसरात होताना दिसून येत होती.