पंढरपूर बस आगाराचा चेन्नईच्या प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव
रेल्वेच्या वेळेत प्रवासी पोहोचल्याने पंढरपूर एसटी आगाराचे सर्व अधिकारी व चालकांचे मानले आभार
संपादक-दिनेश खंडेलवाल
चेन्नई येथील मध्यम वयाचे व ज्येष्ठ नागरिक असलेले महिला पुरुष पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते.
पंढरपूर वरून सोलापूर कडे जाताना रस्त्यातच एसटी बस बंद पडल्याने पंढरपूर आगारातून दुसऱ्या बसची व्यवस्था करून प्रवाशांना वेळेत पोहोचवल्याने चेन्नईतील प्रवाशांनी पंढरपूर आगाराचे डेपो मॅनेजर, बस स्थानक इन्चार्ज, चालक व त्यांना सहकार्य करणारे या सर्वांचे आभार मानून कौतुक केल्याने पंढरपूर आगाराचा डंका हा चेन्नईत दुमदुमला
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे 22 मे रोजी चेन्नईचे 42 महिला-पुरुष मध्यम वयाचे तसेच ज्येष्ठ नागरिक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. चेन्नई येथे भगवान नाम परचरा मंडळी म्हणून भजनी मंडळ कार्यरत आहे. त्यांना सोलापूर रेल्वे स्थानकातून रात्री आठ वाजता चैनई कडे जाण्यासाठी रेल्वे होती. दुपारी चार वाजता पंढरपूर एस टी आगारातून एसटी बस मधून सर्व प्रवासी सोलापूरकडे रवाना झाले. दरम्यान पेनुर च्या पुढे गेले असता सदर एसटीचे रेडिएटर फुटल्यामुळे येथे चालकाला बस थांबवावी लागली याची माहिती पंढरपूर एसटी डेपो मॅनेजर सुधीर सुतार यांना देण्यात आली.
त्यांनीही प्रवाशांची अडचण लक्षात घेता पंढरपूर एसटी डेपोतील चालक बाळासाहेब जाधव यांना एसटी बस नेण्यास सांगितले. यावेळी त्यांना संदीप गोरे, डी एस कोळी, बसस्थानक इन्चार्ज रत्नाकर लाड, विजयकुमार घोलप, माऊली शिंदे, रोहन तारापूरकर, पांडू कोरे आदींचे मोलाचे सहकार्य लाभल्याने ते बंद पडलेल्या एसटीच्या ठिकाणी वेळेत पोहोचले तिथून प्रवाशांना वेळेत रेल्वे स्टेशन मध्ये पोहोच करण्यात येईल असा विश्वास दाखवत सर्व प्रवाशांना धीर दिला.
दरम्यान रेल्वे निघण्यास फक्त एक तासाचा अवधी असल्याचे उपस्थित प्रवाशांनी चालकांना सांगताच चालकांनी वेळे अगोदर 15 मिनिटे रेल्वेस्थानकावर सर्व प्रवाशांना सुखरुप पोहोचवले सर्व प्रवासी आपल्या सामानासह रेल्वेत बसताच रेल्वे चेन्नईकडे मार्गस्थ झाली. चेन्नई मध्ये गेल्यानंतर सर्व प्रवासी एकत्र जमून भगवान नाम परचरा हे भजनी मंडळ चालवणारे संथाना कृष्ण ,ए शंकर, विश्वनाथ सह सर्व प्रवाशांनी पंढरपूर बस आगारातील बस चालक बाळासाहेब जाधव, डीएम सुधीर सुतार सहा त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानून कौतुक केले व त्यांना पंढरपूर येथून सहकार्य करणारे गोपाल साखी,पोलिस फ्रेंन्डस वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य पंढरपूर तालुकाध्यक्ष भोमेश सुतार, पत्रकार दिनेश खंडेलवाल यांनी पंढरपूर आगाराचे डीएम सुधीर सुतार,संदीप गोरे, चालक बाळासाहेब जाधव, सह सर्वांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पेढ्याचे वाटप करण्यात आले.
पंढरपूर आगाराच्या चांगल्या कामाची दखल चेन्नईतील भजनी मंडळ व प्रवाशांनी घेतल्याने तसेच त्यांची चेन्नईमध्ये चांगल्या कामाचा डंका दुमदुमला या सर्वांचे आभार मानून अशाच प्रकारे इथून पुढे सहकार्य करण्यासाठी बळ मिळावे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करण्यात आली.