विठ्ठल च्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांचे पॅनल रिंगणात उतरणारच !
विठ्ठलच्या सत्ताधारी आणि विरोधकात धडकी कायम!
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील अर्थदायीनी समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून पूर्ण ताकदीने अभिजित पाटील यांची तयारी सुरू होती. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात धडकी भरली होती. परंतु उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख असलेले अभिजित पाटील यांच्या विरोधात काही मुद्यावर हरकती घेण्यात आली होती. त्याचा निर्णय काहीही होवो मात्र विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल उभे करून विरोधकांना आव्हान देण्यासाठी तयारी झाली असल्याचे समजते.
यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीत ताकदीने लढण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.
अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत उतरताना केवळ स्वतःला चेअरमन मिळावे या भूमिकेतून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केलेली नाही. केवळ सभासद आणि कामगार यांच्या हिताचे निर्णय घेणारे संचालक मंडळ असावे याच भूमिकेतून निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद कार्यक्षेत्र असलेल्या विविध भागांतून आपला गावभेट, आणि बहुतांशी सभासद यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या आहेत. यामुळे प्रत्येक सभासद यांच्यापर्यंत कारखाना चांगला चालवून दाखविणारे म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
अभिजीत पाटील यांच्या पॅनलमधुन उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक गटातून अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काही अर्ज छाननी वेळी नामंजूर करण्यात आले आहेत. असे असले तरी तगडे पॅनल या विठ्ठलच्या निवडणुकीत उतरविण्यासाठी मोठी व्युहरचना आखली जात आहे. केवळ संचालकांच्या वैयक्तिक हिताचे निर्णय न घेता सभासद आणि कामगार यांच्याच हिताचे निर्णय घेणारे पॅनल या निवडणुकीत उत्तरविणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
मागील अनेक महिन्यापासून विठ्ठलच्या निवडणुकीत उतरून एक आदर्श निर्माण करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी पाऊल टाकले आहे. कारखाना अडचणीत असतानाही प्रति टन 2500/रुपये भाव नक्की देणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
2500 /रुपये भाव देण्याची अभिजित पाटील यांनी केलेली घोषणा ही मोठी धक्कादायक बाब असल्याने यांना विठ्ठलच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारे अडचणी निर्माण करण्यासाठी अनेक गुप्त शक्ती प्रयत्न करीत आहेत.
मात्र या निवडणुकीत सभासद आणि कामगार यांच्या दृष्टीने स्वतःच्या प्रपंचाशी निगडित असलेली ही विठ्ठलची निवडणूक असल्याने अर्ज छाननी च्या निर्णयाकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. विठ्ठल कारखान्याचे जागृत सभासद आतापर्यंत नुकसान केलेल्या लोकांना विठ्ठलची सत्ता देणार की आपल्या अनुभवाने चार कारखाने चालवणाऱ्या पॅनलला सभासद सत्ता देणार यावरून आता ठिक ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे.