राजकिय

विठ्ठल वर यंदा सत्तांतर अटळ? सभासदांचा भरघोस पाठिंबा यावर अभिजीत पाटलांना विठ्ठलची सत्ता मिळणार?

विठ्ठलच्या सभासदांचा अभिजीत पाटलांवरील विश्वास का वाढतोय?

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : शेतकरी सभासदांचा राजवाडा म्हणून ओळख असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मात्र सत्ताधारी गटा मध्येच फूट पडल्याने विरोधी गट असलेल्या अभिजीत पाटील यांचे श्रीविठ्ठल परिवर्तन विकास पॅनल ला शेतकरी सभासद यांचा वाढता पाठिंबा म्हणजेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणारा असा दिसू लागला आहे. अभिजित पाटील यांनी आत्तापर्यंत चार साखर कारखाने यशस्वीरित्या चालवत असल्याने सभासद शेतकऱ्यांना सुद्धा विठ्ठल सहकारी कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू शकतील असा दृढ विश्वास निर्माण झाल्यानेच त्यांना वाढता पाठिंबा लाभत आहे. यामुळे विठ्ठल वर यंदा सत्तांतर अटळ असून सभासद शेतकर्‍यांचा विश्वास वाढू लागला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे लांबलेली विठ्ठलची पंचवार्षिक निवडणूक यंदा जाहीर झाली आहे. आजवरचा विठ्ठलचा इतिहास पाहता ही निवडणूक सत्ताधारी गटाला कायमच सोपी गेल्याचा अनुभव आहे. मात्र विठ्ठलच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन हंगामात दोन वेळा कारखाना बंद राहिला आणि एकूणच विठ्ठलचे सगळे गणितच बदलत गेले. त्यातच सभासद शेतकरी ऊस बिले,तोडणी वाहतूकदार पैसे आणि कामगारांचे पगार पहिल्यांदाच एक वर्षापेक्षा अधिक काळ थकीत राहिले आणि आजवर राजवाडा म्हणून ओळख असलेला कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली दबून बदनाम होत गेला आणि सत्ताधारी गट मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेला.

आ.भारत नाना भालके हयात असताना त्यांनी २०१५ साली विठ्ठलची शेवटची निवडणूक लढवली होती. आणि त्यांचा गट मोठ्या फरकाने विजयी झाला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून गट उभा होता तो प्रा.बी पी रोंगे सर यांचा.वास्तविक रोंगे सर आणि कारखानदारीचा तसा फारसा संबंध नसल्याने लोकांनी त्यांच्यावर पुरेसा विश्वास दाखवला नाही त्यामुळे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र तरीही त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती. सध्या मात्र नानांच्या निधनानंतर बराच काळ लोटून गेला आहे. त्यातच नानांवर विश्वास असणाऱ्या लोकांचा विश्वास भगीरथ भालके व युवराज पाटील हे टिकवून ठेऊ शकलेले नाहीत.

दोन हंगाम कारखाना बंद ठेवणे तसेच थकीत पगार व बिलांमुळे सभासद व कामगारांचा विश्वास कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिजीत पाटील नावाची सध्या विठ्ठलच्या सभासदांना भुरळ पडलेली दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चार बंद पडलेले कारखाने घेऊन त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवले आहेत. यातील एक उदाहरण म्हणून १२ वर्षांपासून बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५ दिवसांत चालू करून संपूर्ण हंगाम त्यांनी गाळप करून दाखवला आहे. त्यामुळे विठ्ठलला जुनी उर्जितावस्था प्राप्त करून द्यायची असेल तर केवळ अभिजीत पाटील हा एकमेव पर्याय असल्याचे अनेक सभासद शेतकरी बोलून दाखवत आहेत.

नानांच्या निधनानंतर सत्ताधारी गटाला गेल्या दोन तीन वर्षात कारखाना निट चालवता आलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाने गमावलेला विश्वास व प्रतिष्ठा याची भरपाई म्हणून अभिजीत पाटील यांच्यावर सभासद मोठा विश्वास टाकताना दिसत आहेत. बंद पडलेला विठ्ठल कारखाना केवळ आणि केवळ अभिजीत पाटीलच चालू करू शकतात असा विश्वास वाटू लागल्याने पाटलांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच विठ्ठलची अवस्था सुधारायची असेल तर अभिजीत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीमत्वांकडे कारखान्याची सूत्रे द्यावी लागतील आणि तेच या पदाला योग्य न्याय देऊ शकतील असे जाणकारांचेही म्हणणे असल्याने सत्ताधारी गटाला आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी व अभिजीत पाटील यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे हे मात्र नक्की….. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close