संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर :-स्वातंत्रयाचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील विविध 75 ठिकाणी आयुष मंत्रालय भारत सरकारच्यावतीने योग महोत्सव संपन्न होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा समावेश आहे.
आयुष मंत्रालय भारत सरकार, पतंजली योगपीठ आणि श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने योग महोत्सव संपन्न झाला. यामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक महिला यांची उपस्थिती लक्षणीय होती. या योग महोत्सवात माजी आमदार प्रशांत परिचारक, उपमुख्य अधिकारी सुनिल वाळूजकर तसेच तालुक्यातील सहा हजाराहून अधिक नागरीकांनी योग महोत्सवात सहभाग घेतला होता.
तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या आणि महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन करत यावेळी योग प्रात्यक्षिके सादर केली.