श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात साखर शिल्लक नसती तर साखरेचे टेंडर निघाले असते का?–भगीरथ भालके
विरोधकांकडून विठ्ठल कारखान्याच्या गोडवानात साखर नसले संदर्भात अपप्रचार
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : श्री विठ़ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजनसोंड, मगरवाडी, तारापूर, खरसोळी व फुलचिंचोली आदी भागात सभासदांच्या गाठीभेटी दौरा पार पडला यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके म्हणाले की आज श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर विरोधकांकडून विठ्ठल कारखान्याच्या गोडवानात साखर नसले संदर्भात अपप्रचार करीत आहेत. विठ्ठल साखर कारखान्यात एक लाख 9 हजार साखर शिल्लक आहे. त्यामुळे 4 जुलै 2022 रोजी साखरेचे टेंडर ओपन होत आहे. त्यामुळे साखर विक्री मधून मिळणाऱ्या साखरेचे पैसे हे एम एस सी बँकेच्या मार्फत झालेल्या सभासदांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. या पूर्वीच कारखान्याच्या सभासदांचे बँक पासबुक एम एस सी बँकेत जमा केले असून सभासदांना हे पैसे मिळणार आहेत.
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच दोन्ही कारखान्याचे आजी-माजी संचालक सर्वश्री राजाराम बाबर, महादेव देठे, धनाजी घाडगे, गोकुळ जाधव, विलास भोसले, नेताजी सावंत, दिनकर पाटील, माधव चव्हाण, प्रदीप निर्मळ, सिद्धेश्वर मोरे, शालिवाहन कोळेकर, महेश कोळकर, शशिकांत पाटील, राजाराम पाटील, नागनाथ पवार आदी श्री विठ़ठल परिवारातील कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.