शेतकऱ्यांच्या विचाराचे सरकार येण्यासाठी रयत संघटनेने घातले बळीराजाला साकडे
अडीच वर्षात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा-दीपक भोसले
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा केला नाही. त्यामुळे त्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही तसेच शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन कापून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचे काम या आघाडी सरकारने केले आहे.
हे सरकार जाऊ दे व शेतकऱ्यांच्या विचाराचे फडणवीस सरकार पुन्हा येऊ दे यासाठी रयत क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले पदाधिकारी व सदस्य शेतकऱ्यांनी बळीराजाला पंढरपूरात साकडे घातले आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दीपक भोसले म्हणाले की आज संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर बळीराजाला साकडे घालून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांवर, जनतेवर केलेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा आहे. कोरोना काळात सरकारने केलेला शेतकऱ्यावरील अन्याय अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल ऊस उत्पादक,द्राक्ष उत्पादक, डाळिंब उत्पादक,केळी उत्पादक,कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला असून या सरकारने कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाहीत आर्थिक मदत दिली नाही त्यामुळे शेतकरी हा देशोधडीला लागला आहे.
म्हणून आमचे बळीराजा कडे मागणी आहे की हे भावा हे आघाडी सरकार जाऊ दे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे फडणवीस सरकार येऊ दे कारण फडणवीस सरकारच्या वेळी शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट केले नाही शेतकऱ्याला अवकाळी तसेच इतर नुकसानीची मदत मिळाली यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार येऊ दे म्हणून आज राज्यभर बळीराजाला रयत क्रांती संघटनेच्यावतीने साकडे घालून आंदोलन करण्यात येत आहे.