क्राइम

दहशत निर्माण करण्यासाठी जेऊर भागात तलवार बाळगणारे ११ इसमांवर कारवाई

स्थानिक पोलिसांची कारवाई;भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असेल्याने निवडणुका शांततेत पार पाडावी यासाठी शस्त्रबंदी कायद्या अंतर्गत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी छापे मारून पंजाब मधून तलवारी विकत आणून या ठिकाणी विकल्या जात असल्याची माहिती घेत बारा तलवारी जप्त करून आरोपींना जर बंद केले आहे.

याबाबत स्थानिक पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने नुकतीच राज्यातील नगरपालिका यांचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हयात आदर्श आचार संहिता जाहिर झालेली आहे. सदर आचार संहितेचे काटेकोरपण पालन होवून शांतता व भयमुक्त निवडणूका पार पाडण्यासाठी श्रीमती तेजस्वी सातपुते (भा.पो.से.),पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना जिल्हयात अवैध शस्त्र बाळगणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले आहे.

त्याअनुशंघाने सुहास जगताप पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी धनयंज पोरे,सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकास अवैध शस्त्र बाळगणारे लोकांबाबत कारवाई करण्याबाबत सुचीत केले होते. त्यावरून सपोनि पोरे यांच्या पथकास अक्कलकोट तालुक्यातील जेऊर भागामध्ये पंजाब राज्यातून एक इसम अवैधपणे तलवारी मागवून घेवून तो सदर भागातील लोकांना विक्री करत असल्याबाबतची बातमी समजून आली होती. सदर बातमीची पडताळणी करण्यासाठी सपोनि पोरे व पथकाने जेऊर गावात जावून पंजाबमधून तलवारी मागवून विक्री करणारे इसमास ताब्यात घेतले.

सदर इसमाकडे अधिक विचारपूस करता त्याने सुरूवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू त्यास अधिक विश्वासात घेवून तपास केला असता त्याने फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्या असून सदरच्या तलवारी या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, पानमंगरूळ, करजगी व अक्कलकोट शहरातील तसेच दक्षीण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केली असल्याची कबूली दिली.

त्यावरून सदर तलवारी विकत घेणारे लोकांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला. सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून जेऊर येथील इसमाकडून विकत घेतलेल्या एकूण १२ तलवारी जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या व लांबी-रुंदीच्या एकूण २६,१००/- रूपये किंमतीच्या तलवारी जप्त करण्यात आल्या सदर फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी मागवणारा व विकत घेणारे असे एकूण ११ लोकांविरूध्द अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणेस गु.र.नं. ३९२ / २०२२, भारतीय शस्त्र अधिनियमचे कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि काकडे, अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही श्रीमती तेजस्वी सातपुते (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,
हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, सुहास जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय पोरे, सहा. फौ. श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर, पोह
सलीम बागवान,विजय भरले, हरीदास पांढरे, पोना रवि माने सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी
पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close