सामाजिक

व्यापारी उद्योग सेलच्या पदाला एक वर्ष पूर्ण होताच केक कापून केली वर्षपूर्ती साजरी

नागेश फाटे यांना पुढील कार्यासाठी दिल्या शुभेच्छा

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील उद्योगपती म्हणून समजले जाणारे नागेश फाटे यांना राज्य व्यापारी उद्योग सेलचे प्रदेश अध्यक्ष पद लाभले होते.

या पदावर काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून व्यापार व छोटे उद्योगांना चालना मिळण्यासाठी कार्य केले. ठिकठिकाणी बैठका व विचारविनिमय करून तरुणांना युवकांना उद्योजकासाठी प्रेरित करून त्यांना सहकार्य करण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विश्वासास पात्र राहून राज्य व्यापार उद्योग सेलचे कार्य वाढवण्यासाठी व बळकटी आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. आज त्यांच्या या पदाला एक वर्ष पूर्ण झाल्याने स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी वर्षपूर्ती सोहळा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके मनसेचे दिलीप धोत्रे सह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close