ईतर

श्री विठ्ठल मंदिर परिसरात रस्तारुंदिकरणास विरोध

व्यापारी व नागरिकांनी बंद पाळून केला निषेध

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर: वाराणसी कॉरीडॉर प्रमाणे पंढरीत देखील चौफाळा ते महाव्दार घाट या रस्त्याचे दोनशे फूट रूंदिकरण करण्याचे नियोजन अधिकारी पातळीवर सुरू असल्याचा आरोप येथील व्यापारी व नागरिकांनी केला असून याला विरोध दर्शविण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात आज बंद पाळण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये नागरिकांची घरे किंवा दुकाने पाडून विकास करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे.


आषाढी एकादशीस श्री विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेस आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीर्थक्षेत्र पंढरीचा सर्वकष विकास करण्यात येईल असे आश्‍वासन दिले होते. याचाच एकभाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या पथकाने वाराणसी कॉरीडॉरीची पाहणी केली आहे. तसेच पंढरपूर येथे देखील याच पध्दतीने श्री विठ्ठल मंदिर परिसरात दोनशे फूट रूंदिकरणाचा प्रस्ताव तयार केला असल्याची सध्या येथे जोरदार चर्चा सुुुुरू आहे. याला विरोध करण्यासाठी चौफाळा ते महाव्दार रस्त्यावरील दुकानदार व रहिवासी नागरिकांनी बंंद पाळून प्रस्तावित आराखड्यास विरोध दर्शविला आहे. येथील नागरिकांंनी स्थानिकांची घरे किंवा दुकाने न पाडता विकास करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान यापूर्वी १९८२ साली मंदिर परिसरात रस्ता रूंदिकरण झाले असून त्यावेळी विस्थापित झालेल्या अनेक नागरिकांचे पुर्नवसन झाले नसल्याचे उदाहरण देण्यात आले. तसेच पंढरपूर येथे आज पर्यंत तीनवेळा रूंदिकरण करण्यात आले आहे. यामुळे रूंदिकरणास विरोध दर्शविण्यात आला.
दरम्यान बुधवारी सकाळ पासूनच मंदिर परिसरातील एकही दुकाने उघडण्यात आली नव्हती. सकाळी अकरा वाजता व्यापारी, नागरिक यांनी पश्‍चिमव्दार येथे ठिय्या आंदोलन करून भजन केले. मंदिर परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने भाविकांना कुंकू, बुक्का व प्रसादाचे साहित्य खरेदी करता आले नाही. यावेळी सर्वांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मंदिर समितीचा ज्ञानेश्‍वर दर्शन मंडप न पाडता तेथे समितीचे प्रशासकीय कार्यालय व व्हिआयपी प्रतिक्षालय करावे, मंदिर परिसरात चारचाकी प्रमाणे दुचाकी वाहनांना देखील बंदी करावी, हा परिसर अतिक्रम मुक्त करावा व नो हॉकर्स जाहीर करून याची अंमलबजावण करावी, स्थानिकांच्या वाहनासाठी वाहनतळ करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, भागवत बडवे, व्यापारी संघाचे प्रभाकर कौलवार, कौस्तुभ गुंडेवार, अरूण कोळी, मनसेचे संतोष कवडे, शिंदे गट शिवसेनेचे सुमित शिंदे, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक सोमनाथ होरणे, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, बाळकृष्ण डिंगरे,संजय झव्हेरी,राहुल परचंडे, राजेश उराडे, सागर खंडागळे, रोहित पारसवार आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close