बिझनेस

सांगोला साखर कारखान्याचा द्वितीय बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट-चेअरमन अभिजीत पाटील

संपादक-दिनेश खंडेलवाल

२०० रू. दिवाळीसाठी हाफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर तर कामगारांना १५ दिवसाचा पगार बक्षीस म्हणून जाहीर

पंढरपूर : सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना गेली १२ वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५ दिवसात धाराशिव साखर कारखान्याने सुरू करून विक्रमच केला होता. त्याच धर्तीवर सन २०२२-२३ चा बॉयलर अग्नी प्रतिपादन व द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख तसेच डीव्हीपी परिवाराचे अध्यक्ष व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, विठ्ठलचे व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलताताई रोंगे, सांगोला संचालक विश्वनाथ आप्पा चव्हाण, तानाजी काका चव्हाण, सुभाष पाटील, तुकाराम जाधव, ॲड.ढाळे, सरपंच अभिजीत नलवडे, मधुकर आबा नाईकनवरे, विष्णुभाऊ बागल तसेच धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

सन २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या ३ लाख ३० हजार गाळप केले असून शेतकऱ्यांची दिवाळी हि गोड व्हावी याकरिता दिवाळी हाफ्ता म्हणून २००रू. ने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल तसेच कामगारांना दिवाळी बोनस म्हणून १५ दिवसांचा पगार बक्षीस जाहीर करण्यात आले. यावेळी बोलताना म्हणाले की साखर निर्यातीवर आमदार शहाजी बापू पाटील यांनी शासनदरबारी आवाज उठवून बंदी उठवावी बंदी उठवल्यास शेतकऱ्यांना अजून चांगल्याप्रकारे भाव देण्याचे सोईस्कर होईल. तसेच याहंगामात ८५८६ हेक्टर ऊसाची नोंद आली असून लवकरच नोंदीप्रमाणे ऊस तोडण्याचे सुरू होईल. असे अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जाहीर केल्याप्रमाणे यंदाही ऊस कुठूनही काटा करुन या असे ठोक बोलत शेतकऱ्यांचा विश्वास धाराशिव साखर कारखान्याने संपादन केला असून वेळेवर बिल देऊन शेतकऱ्यांचे हित कायम डोळ्यासमोर ठेवून संस्था व संचालक प्रामाणिकपणे काम करत राहील असा ठाम विश्वास दिला.

तसेच होम हवन पूजा सौ वश्री सुरेखा धनाजी ज्ञानेश्वर खरात(सोनके) व मोळी पूजन सौ व श्री कलावती तुकाराम नारायण कुरे (कासेगाव) या दाम्पत्याच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नंदकुमार बागल यांनी मानले.

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संदीप खारे, संजय खरात, सुरेश सावंत तसेच जनरल मॅनेजर, केमिस्टर चीफ, इंजिनिअर, व सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी बांधव, तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close