पंढरीत महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर
विभागीय कार्यालय पुन्हा कार्यान्वित करा अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा!
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर
विभागीय कार्यालय पुन्हा कार्यान्वित करा अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा!
पंढरपूर: पंढरपूर सह नागपूर,औरंगाबाद,नाशिक, आणि पुणे विभागातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेतील एम्प्लॉय कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले असून विभागातील बंद केलेली कार्यालये पुन्हा कार्यान्वित करा अन्यथा आंदोलन तीव्र करून बेमुदत संपाचा इशारा दिला.
आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या एम्पलाॅय युनियन औरंगाबाद विभागाचे सर्व कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजमेंटने युनियनचे झोनल ऑफिसचे संलग्न अधिकृत कार्यालय होते. दरम्यान पुणे,नागपूर, औरंगाबाद,नाशिक ही कार्यालये ३१ डिसेंबर पासून बंद केलेली आहेत.
त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झालेला आहे. या गोष्टीचा निषेध व सर्व कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावी यासाठी आज सर्व कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले आहेत. वरील विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी बँक मॅनेजर ना सुचित केले आहे की आपण बंद केलेले कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावे अन्यथा संपाचे तीव्र आंदोलन रूप धारण करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बँक मॅनेजमेंट ला दिला आहे.
महाराष्ट्र बँक महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता आहे. या ठिकाणी विविध पदावर असलेला पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत नाही यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी बँक मॅनेजमेंट कडे केली आहे.