इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ अनुप फडे
इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर नूतन पदाधिकारी निवड
संपादक-दिनेश खंडेलवाल
इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ अनुप फडे
इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर नूतन पदाधिकारी निवड
पंढरपूर : इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधे मावळते अध्यक्ष डॉ.प्रसन्न भातलवंडे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वानुमते इंडियन डेंटल असोसिएशन पंढरपूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.अनूप फडे यांची 2023 या वर्षासाठी निवड करण्यात आली.
सचिवपदी डॉ.अमृता दोशी यांची तर खजिनदारपदी डॉ.अनुराधा खंडागळे यांची निवड झाली आहे. प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.ऋचा खुपसंगीकर, डॉ.प्रतिभा देशपांडे यांची निवड झाली आहे. पंढरपूर तालुका आणि परिसरातील दंतवैद्यांची ही संघटना आहे. वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे डॉ.अनूप फडे यांनी सांगितले.
संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ.महेश देशपांडे,डॉ.योगेश दोशी, डॉ.अभिजीत खुपसंगीकर,डॉ प्रसन्न फडे, डॉ राहुल आठवले,डॉ वैभव कुलकर्णी,डॉ निनाद जमदाडे आदी उपस्थित होते. मावळते सचिव डॉ.प्रतीक दोशी यांनी आभार मानले.