ईतर
पंढरीतील नवजीवन चिल्ड्रन्स हाॅस्पिटल मध्ये मोफत बालरोग निदान शिबिर
आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीतील नवजीवन चिल्ड्रन्स हाॅस्पिटल मध्ये मोफत बालरोग निदान शिबिर
आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
पंढरपुरातील लहान मुलांचे देवदूत समजले जाणारे सुप्रसिद्ध डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत बालरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये जन्मजात बालकासह अठरा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत तपासणी करून औषध दिले जाणार आहे. त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉक्टर शितल के शहा यांनी दिली.