डॉक्टर शितल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
रक्तदान शिबिर,वृद्धाश्रम भोजन तसेच पालवी संस्था,नवरंगे बालकाश्रम येथे कार्यक्रम
संपादक-दिनेश खंडेलवाल
डॉक्टर शितल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
रक्तदान शिबिर,वृद्धाश्रम भोजन तसेच पालवी संस्था,नवरंगे बालकाश्रम येथे कार्यक्रम
पंढरपूर : “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” माणून ज्यांनी आजपर्यंत वैद्यकीय सेवेत अविरत कार्य केले असे पंढरपूर शहरातील नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर शितल के शहा यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
नवजीवन बाल रुग्णालय येथे सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर शीतल शहा यांच्या ७१ वा वाढदिवस असल्याने ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे तेथील वृद्धांना वाढदिवसाच्या निमित्ताने मिष्टांन्न भोजन देण्यात आले. तर नवरंगे बालकाश्रम आणि पालवी येथे खाऊवाटप करण्यात आले.
गरीब रुग्णांनी डॉक्टर शहा यांना आपले दैवतच मानले आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरातील देव असे संबोधले जाते त्यांच्या स्वभावामुळे व रुग्णांना हात लावताच रुग्ण बरे होणार या विश्वासाने आज प्रत्येक रुग्णांची डॉक्टर शितल के शहा यांच्याशी नाळ जुळलेली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. बाल रुग्णांसाठी दैवत समजले जाणारे डॉक्टर शहा हे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात तसेच गोरगरीब रुग्णांना खर्चिक उपचार परवडण्यासाठी शासनाच्या मोफत योजनेत बसवून रुग्ण बरे करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.
डॉक्टर शितल के शहा यांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्न लाभावे यासाठी विठ्ठलाकडे साकडे घालण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुधीर आसबे,डॉ सुनील पाटवा, डॉ रविराज भोसले, डॉ विनायक उत्पात तसेच कर्मचारी कीर्तीकुमार भोरकडे,राहुल भोरकडे, प्रविण चंदनशिवे, लक्ष्मी दंडगुल,मिरा माने आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.