संपादक-दिनेश खंडेलवाल
अंगणवाडी पी-२७ मध्ये पोषण पखवडा कार्यक्रम संपन्न
पालकांना सकस व पोष्टीक आहाराचे महत्त्व सांगण्यात आले
पंढरपूर : पंढरपूर शहरातील जुनी माळीगल्ली येथील अंगणवाडी क्रमांक २७ मध्ये पोषण पखवाडा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित पालकांना सकस व पौष्टिक आहाराचे महत्व सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
माजी नगरसेवीका सौ. लक्ष्मीबाई पवार यांनी दिपप्रज्वलन केले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प पंढरपूर नागरी बीट क्रमांक एक अंतर्गत अंगणवाडी क्रमांक पी/२७ माळी गल्ली येथे सीडीपीओ सौ. वर्षा पाटील मॅडम व मुख्यसेविका सौ. जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार पोषण पखवडा हा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी पालकांना भरड धान्य, कडधान्य व तृणधान्ये यापासून पदार्थ बनवून सकस व पोष्टीक आहाराचे महत्त्व आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहे हे सांगण्यात आले. “सकस व पोषण गुडी उभारू या सुदृढ बालक घडवू या” केसरी पांढरा व हिरवा या रंगाच्या फळ भाज्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. याबद्दल पोषण गुडी उभारू न महत्व सांगण्यात आले.
कार्येक्रमासाठी अंगणवाडी सेविका सौ. जयश्री राजेंद्र सोनवणे,अशा वर्कर सविता डोके,मदतनीस प्रियांका सर्वगोड,अन्नपूर्णा भारत गायकवाड,पंचशिला दत्तात्रय कांबळे,आशा क्षीरसागर,वनमाला देवमारे, दूरगा रावळ,संजीवनी पलसे, सारीका भोसले, सत्वशिला ओव्हाळ, नौशाद मुजावर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात गर्भवती माता,स्तनदा माता, पालक, किशोरी मुली, लहान बालके आदी उपस्थित होते. पालकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.