संपादक-दिनेश खंडेलवाल
जाहिरात…….. जाहिरात….. जाहिरात……
पंढरीत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीचे समारोप
“हरित वारी,निर्मल वारी, आरोग्य वारी”
पंढरपूर:- महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी २०२३ चा समारोप कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषवणार असून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सह मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे समारोप होणार आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून येथील पंचायत समितीच्या पाठीमागील आवारामध्ये सदर कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रकल्प संचालक शेखर रौंदळ, प्रकल्प संचालक सुषमा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.