अंगणवाडी पी २७ येथे गर्भवती मातांची ओटी भरण कार्यक्रम संपन्न
स्तनपान सप्ताह निमित्ताने गर्भवती मातांना मार्गदर्शन
संपादक-दिनेश खंडेलवाल
अंगणवाडी पी २७ येथे गर्भवती मातांची ओटी भरण कार्यक्रम संपन्न
स्तनपान सप्ताह निमित्ताने गर्भवती मातांना मार्गदर्शन
पंढरपूर :- एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी अंतर्गत पंढरपूर शहरातील सर्व अंगणवाडीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहाचे औचित्य साधून अंगणवाडी क्रमांक पी २७ माळी गल्ली येथे गर्भवती मातांचा ओटी भरण कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका सौ. जयश्री सोनवणे यांनी उपस्थित महिलांना स्तनपान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की बाळाला प्रथम चिकाचे दूध देणे आवश्यक आहे. कारण तेच बाळाचे पहिले लसीकरण आहे. बाळाला आईच्या कुशीतच जास्त वेळ ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा तेव्हा स्तनपान करावे. स्तनपान हा आईचा गोंडस अनुभव आहे. जेणेकरून आईचे मातृत्व व बाळाचे ऋणानुबंध घट्ट होतात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला हे जग नवीन असतं आणि बाहेरील प्रदूषणापासून बाळाचे रक्षण तिची माताच करू शकते. बाळाच्या आईने नेहमी सकस व चौरस आहार घ्यावा त्याचबरोबर आपल्या बाळाचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सीडीपीओ सौ. वर्षा पाटील मॅडम व मुख्य सेविका सौ. सारिका संनगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी गर्भवती मातांची ओटी भरून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर गर्भवती मातांना सकस आहार व गुळ शेंगदाणे लाडू देण्यात आले व पालकमातांना फळे वाटप करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सौ.जयश्री राजेंद्र सोनवणे व मदतनीस सौ. प्रियंका राजू सर्वगोड यांनी परिश्रम घेतले.