शैक्षणिक

अविरत २५ वर्षे, अनेक पिढ्यांना तंत्रशिक्षणाचे बोधामृत,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा आनंददायी, गौरवशाली रौप्यमहोत्सव

स्वेरीच्या रौप्य महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

संपादक: दिनेश खंडेलवाल

अविरत २५ वर्षे, अनेक पिढ्यांना तंत्रशिक्षणाचे बोधामृत,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा आनंददायी, गौरवशाली रौप्यमहोत्सव

स्वेरीच्या रौप्य महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

पंढरपूर :- अवघ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूरला शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक मिळवून देणारे स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग होय. पंढरपूर तालुक्यातील माळरानावर लावलेले छोट्याशा वेलीचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अखंड कष्ट आणि परिश्रमातून वटवृक्ष निर्माण केले आहे. अशा या वटवृक्षाचे 25 व्या रोप्यमहोत्सवी सांगता समारंभ पार पाडताना अनेक पिढ्यांना घडवण्याचा अभिमानही दिसून येतो.

अशा या सांगता समारंभासाठी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून स्वेरीचा आनंद द्विगणित करावा असे आवाहन संस्थापक सचिव प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे, अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त, सर्व प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यावतीने करण्यात येत आहे.

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग,पंढरपूर गेली २५ वर्षे अविरतपणे अनेक पिढ्यांना तंत्रशिक्षणाचे बोधामृत देत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. दि. १७ ऑगस्ट, १९९८ रोजी गोपाळपूरच्या माळावर १३ हजार स्क्वे. फुटाच्या पत्राशेड मधून १६० विद्यार्थी, ८ शिक्षक व २ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह रुजलेल्या या ज्ञानबिजाचे २५ वर्षात सुमारे ५००० विद्यार्थी, २५० शिक्षक, २०० शिक्षकेतर कर्मचारी यांसह विशाल अशा ज्ञानवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच संस्थेचे एकूण आर. सी. सी बांधकाम सुमारे ५.५० लाख स्क्वे.फुट इतके झाले आहे. स्वेरीची ज्ञानपताका गोपाळपूरच्या बाहेर सोलापुरातही फडकली आहे.

स्वेरीने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन आपल्याकडे घेऊन त्या माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअरिंग व आयटीआय या महाविद्यालयांची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. या गौरवशाली रौप्यमहोत्सवी महोत्सवाचा सांगता समारंभ बुधवार, दि. १६ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. प्रा. डॉ. रजनीशजी कामत प्रभारी कुलगुरू पु. अ. हो. सो. वि. सोलापूर, व प्रमुख पाहुणे – आ. श्री. राम सातपुते साहेब
विधानसभा सदस्य, माळशिरस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ६ वाजता सारेगमप महाविजेती सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड (पिसे), गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कु. कौस्तुभ गायकवाड व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक व संगीतकार गुरूवर्य पं. कल्याणजी गायकवाड यांचा स्वरानुभूती हा हिंदी व मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून आमचा आनंद वृद्धिंगत करावा असे आवाहन स्वागतोत्सुक – श्री. दादासाहेब रोंगे अध्यक्ष, श्री. हनिफ शेख उपाध्यक्ष, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे संस्थापक-सचिव व सर्व विश्वस्त श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close