पंढरपूर तालुक्यात सण, उत्सव, यात्रा, जयंती वर तिसऱ्या डोळ्यांची राहणार नजर
प्रत्येक गावात किमान दहा सीसीटीव्ही बसवा- पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तालुक्यात सण, उत्सव, यात्रा, जयंती वर तिसऱ्या डोळ्यांची राहणार नजर
प्रत्येक गावात किमान दहा सीसीटीव्ही बसवा- पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आगामी काळात होणारे सण,उत्सव, यात्रा, महापुरुषांची जयंती या अनुषंगाने किमान दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याच्या माध्यमातून नजर ठेवण्याच्या सूचना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांच्या बैठकीत दिल्या.
या बैठकीत त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धती व प्रभावी वापराबाबत मार्गदर्शनपर माहिती दिली. सर्व पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत व एनजीओच्या मदतीने आपल्या गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या चौकामध्ये, गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे किमान दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचबरोबर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट ची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणे जेणेकरून अशा पोस्ट च्या माध्यमातून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सूचना करण्यात आल्या.
सध्या मराठा आंदोलन, धनगर आंदोलन, ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे काम केले पाहिजे याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कशाप्रकारे दक्षता घेतली गेली पाहिजे याबाबतही मार्गदर्शन केले. गावामध्ये अनधिकृत फ्लेक्स, बॅनर याबाबत दक्षता घेतली पाहिजे, यावरून वादविवाद होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी. चांगली कामगिरी करणार्या पोलीस पाटलांचा या बैठकीत सत्कार करण्यात आला.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर आपल्या कामाची पद्धत आणि गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सुरुवात केली आहे.