होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
अनेकांनी जिंकली भरगच्च बक्षीसे,पैठणी खेळाच्या आनंदात मग्न झाली महिला वर्ग
संपादक-दिनेश खंडेलवाल
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
अनेकांनी जिंकली भरगच्च बक्षीसे,पैठणी खेळाच्या आनंदात मग्न झाली महिला वर्ग
पंढरपूर : भारत कृषी प्रदर्शनातील सांस्कृतिक कार्यक्रमात खेळ पैठणीचा रंगला याचे सादरीकरण केले होते पुणे येथील रमेश दादा परळीकर यांनी त्यांच्या कौशल्याने विविध खेळात महिलांनी भाग घेऊन भरगच्च बक्षीसांचा खजिना लुटला.
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिला वर्गांने अलोट गर्दी केली होती.
सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये उखाणे, जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती.
यावेळी विशेष म्हणजे तळ्यात-मळ्यात हा खेळ तर खूप रंगल्याने महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी मराठी, हिंदी गाणी, नृत्य, मनोरंजन खेळ, विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये प्रथम क्रमांकास पैठणी, दुसऱ्या क्रमांकाला सोन्याची नथ, तर तिसऱ्या क्रमांकाला ठुशी हे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे सादरीकरण रमेशदादा परळीकर यांनी केले. या स्पर्धेचे उत्कृष्ट असे नियोजन डॉ. प्रणिताताई भालके यांनी केले होते.
या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्यासपीठ भगीरथ भालके यांनी उपलब्ध करून दिल्याने महिलांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले होते.