क्राइम

शिरभावीत जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या, आरोपीस अटक

अवघ्या तीन दिवसांत तपास पूर्ण, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

संपादक-दिनेश खंडेलवाल

शिरभावीत जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या, आरोपीस अटक

अवघ्या तीन दिवसांत तपास पूर्ण, सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

पंढरपूर: सांगोला तालुक्यातील शिरभावी गावच्या हद्दीत असणाऱ्या वनविभागाच्या जागेत तीन दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्याच घरातील नातेवाईकाने जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून राग धरून तिच्यावर चाकूने वार करत डोक्यात दगड घालून खून केल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी सदर महिलेच्या मृतदेहाकडे पाहीले असता कोणीतरी खून केल्याचे दिसून येत होते. याबाबत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या तीन दिवसात आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजणेचे सुमारास मौजे शिरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत एका ५५ ते ६० वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या आवस्थेत मिळुन आला होता. सदर घटने बाबत सांगोला पोलीस ठाणे गुरनं २१७/२०२४ भादवि कलम ३०२,२०१ अन्वये दि. ११/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील मयत व्यक्ती हि वृध्द महिला असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर स्था.गु.शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्था.गु. शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांचे पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेवुन अटक करणेबाबत आदेशीत केले.

सदर सुचने प्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह सांगोला परिसरातुन अज्ञात मयत महिलेची माहिती प्राप्त करुन तिची ओळख पटवली. सदर मयत महिलेचे नांव व्दारका बबन माने, रा. धायटी, ता. सांगोला असे असुन ती तिच्या दोन मुला समवेत राहत असल्याचे समजले. सदर महिला हि दिनांक ११/०३/२०२४ रोजी धायटी ता. सांगोला येथील तिचे घरातुन त्याच परिसरात राहणारे तिच्या भावाकडे गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटने बाबत सखोल तपास करुन मयत महिला हिचे बाबत गुन्हा उघकीस आणण्याचे दृष्टीने अधीक माहिती प्राप्त केली असता सदर महिलेच्या मृत्यु नंतर तिच्या सख्या भावाचे व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले. या घटनेतील गांभीर्य ओळखून अधीक तपास करता मयत हिचा भाचा हा गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तीत्व लपवुन राहत असलेचे पोलीसांच्या लक्षात आले.

सदर गुन्हयातील संशयीत आरोपी याचा सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपुर, सांगोला, अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदार मार्फत शोध घेत होते.‍ दिनांक १४/०३/२०२४ रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी हा अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये येणार आहे. नमुद माहिती प्राप्त होताच दोन्ही पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजार पेठेत शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेतले.

घटनेतील सदर आरोपीस विश्वासात घेवुन त्याच्याकडे गुन्हया संदर्भात कौशल्यपुर्ण तपास केला असता, सदर आरोपीने त्याची मयत आत्या व्दारका बबन माने हि आरोपी व त्याच्या कुंटुबीयांवर जादुटोणा करीत होती व त्यामुळे आपल्या कुंटुबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरुन दिनांक ११/०३/२०२४ रोजी सायंकाळी मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत घेवुन जावुन चाकुने वार करुन व दगडाने डोके ठेचुन खुन केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीस दिनांक १४/०३/२०२४ रोजी अटक केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक खणदाळे सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस ‍निरीक्षक धनंजय पोरे, व पोलीस उप- निरीक्षक सुरज निंबाळकर यांचे पथकातील ग्रेडपोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ विजयकुमार भरले, सलीम बागवान, हारिदास पांढरे, पोना धनराज गायकवाड, पोकॉ यश देवकते, समर्थ गाजरे, तसेच अक्कलकोट पोलीस ठाणे कडील पोहेकॉ महादेव चिंचोळकर, पोकॉ प्रमोद शींपाळे, सचिन गायकवाड यांनी बाजवली आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close