आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी
दर्शनरांगेत घुसखोरीची दक्षाता घेत डबल बॅरेकेटींग करुन सुरक्षा व्यवस्था ठेवावी
संपादक-दिनेश खंडेलवाल
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी केली विविध ठिकाणची पाहणी
दर्शनरांगेत घुसखोरीची दक्षाता घेत डबल बॅरेकेटींग करुन सुरक्षा व्यवस्था ठेवावी
पंढरपूर : – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून पंढरपूरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आषाढी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड दर्शन रांग, वाळंवट, ६५ एकर, भीमा बसस्थानक तसेच पालखी मार्ग व तळांची पहाणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी सुशील संसारे,मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सा.बां.कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दर्शनरांगेत भाविकांची घुसखोरी होणार नाही यांची दक्षाता घेवून डबल बॅरेकेटींग करुन आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवावी. दर्शन रांगेत वि.प्र. दत्त घाटावर स्कायवॉक लावण्याबाबत तात्काळ नियोजन करावे. जेणे करुन इतर घाटावरील भाविकांची गर्दी कमी होईल. महाव्दार व चंद्रभागा घाटांवर बॅरेकेटींग करावे. जुना दगडी पुलांवर बॅरेकेटींग व लाईटची व्यवस्था करावी. ६५ एकर येथे नळाच्या स्टॅण्ड पोस्टची संख्या वाढवावी. भीमा बसस्थानकावर मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. टॉयलेटसाठी वापरण्यात आलेला जुना पत्रा तत्काळ काढून नवीन पत्रा लावावा तसेच मुरमीकरण करावे. तसेच पालखी तळांवर वारकरी भाविकाच्या सुविधेसाठी उपलब्ध टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, विद्युत सुविधा, स्नानगृह, अग्नीशमन व्यवस्था आदी ठिकाणची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या.तसेच होडीचालकांना होडीमध्ये लाईफ जॅकेटची उपलब्धता करुन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले.
गुजराती कॉलनीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीला भेट देवून सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी कुमार आशीर्वाद म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरावर मार्ग निघणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पुर्ण करण्यात येतील. शासनस्तरावरील मागण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करुन त्या पुर्ण करण्यात येतील. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सफाई कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करुन देण्याच्या मागणीबाबत सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी मांडणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
यावेळी नगर पालिका प्रशासनाकडून गुजराती कॉलनीत सफाई कर्मचाऱ्यांचे घरावरील बदलले पत्रे, शौचालय व्यवस्था व दुरुस्ती आदीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपमुख्यधिकारी सुनिल वाळुंजकर, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर तसेव सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गुरु दोडीया यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच मागण्याबाबतची माहिती देवून त्या तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी केली.