राजकिय

लक्ष्मी-टाकळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सागर भैया सोनवणे

साठे व परिचारक गटाचे सोनवणे यांना १० मताधिक्य मिळाले

संपादक-दिनेश खंडेलवाल 

लक्ष्मी-टाकळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सागर भैया सोनवणे

साठे व परिचारक गटाचे सोनवणे यांना १० मताधिक्य मिळाले

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरालगत मोठी ग्रामपंचायत असलेल्या लक्ष्मी टाकळी च्या उपसरपंच पदी शिंदे शिवसेना – भाजपा गटाचे (परिचारक गटाचे) उमेदवार सागर भैया सोनवणे यांची अत्यंत चुरशीच्या लढती मध्ये १०-७ मते पडून विजयी झाले. शिंदे गट शिवसेना व भाजपा कडे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत चे निर्विवाद वर्चस्व झाले सिद्ध.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी एकूण १७ सदस्य असणारी ही ग्रामपंचायत शिंदे शिवसेना व परिचारक गटाचे एकूण ११ सदस्य तर विरोधी गटाचे ६ सदस्य असून विरोधी गटाचे उमेदवार यांना ७ मते पडली तर परिचारक गटाचे उमेदवार सागर भैया सोनावणे यांना १० मते पडली. सलग २५ वर्ष परिचारक गटाचे अत्यंत निष्ठेने काम करणारे सोनवणे कुटुंबीय सलग २० वर्ष ग्रामपंचायत सदस्य पद हे सोनवणे परिवारा कडे आहे. अनिल सोनवणे हे सलग २ वेळा निवडून येऊन २०१० साली उपसरपंच पदाचा पाहिला बहुमान मिळाला होता. २०१० साली काका उपसरपंच २०२४ साली पुतण्या उपसरपंच हे काका पुतण्या चे राजकारण सगळ्या महाराष्ट्रा मध्ये दिसत आहे. २४ तास समाजकारणाचा वारसा जपत अनेक जेष्ठ महिलांना श्रावण बाळ योजने अंतर्गत १५०० रुपये महिना लाभ मिळवून दिला, संजयगांधी निराधार योजने अंतर्गत, अनेक महिलांना १५०० रु. लाभ मिळवून दिला, २०१९ साली उज्वला गॅस योजने अंतर्गत ९० कुटुंबाला गॅस कनेक्शन मोफत घरपोच देऊन अनेक कुटुंबाला रेशन कार्ड, काढून दिले, लाडकी बहीण योजने चा टाकळी परिसरात मोठा कॅम्प घेऊन २७४ महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला. इथून पुढे गावातील योजना ह्या प्रत्येकाच्या घरादारापर्यंत पोहचवून प्रत्येक कुटुंबला शासनाच्या योजनेचा फायदा व लाभ मिळवून देण्यासाठी उपसरपंच पदाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सागर सोनवणे यांनी सांगितले.

शिंदे गटाचे सरपंच संजय तात्या साठे, महेश नाना साठे कुटुंबीय यांचे ४ सदस्य, व परिचारक गटाचे ७ सदस्य, अशी युती असून सरपंच संजय तात्या साठे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रकिया पार पडली. अंत्यन्त चुरशीच्या लढती मध्ये सागर भैया सोनवने हे १० मतांनी विजयी झाले. शिंदे- भाजप गटाचे एक मत फुटले तरी विजय मिळवण्यात यशस्वी झाले. यावेळी सर्वांचे सहकार्य लाभले. जि.प सदस्य रामदास (आप्पा) ढोणे, शिवसेना जिल्हा प्रमुख, तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती सोलापूरचे महेश (नाना) साठे, विष्णुपंत तात्या ताड, चेअरमन महादेव काशीद, नानासाहेब मोरे,विठ्ठल ढोणे,दाजी चंदनशिवे, आबासाहेब पवार, सुरेशभाऊ टिकोरे,बिनू नाना खपाले,अनिल सोनवणे, औदुंबर पोतदारमा. सरपंच संजय तात्या साठे, माजी सरपंच नंदकुमार वाघमारे, ग्रा. पं सदस्य औदुंबर ढोणे, महादेव पवार, सचिन वाळके, बापू उकरंडे,बापू देवकते, सागर कारंडे, गणेश ढोणे, गणेश चंदनशिवे. दादा धोत्रे, अंकुश ढोणे, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे व कर्मचारी वर्ग ग्रा.पं सदस्या, सौ. नागरबाई साठे, सौ आशाबाई देवकते, सौ रेश्मा साठे, सौ. विजयमाला वाळके सौ. रोहिणी साठे. सौ. रुपाली कारंडे यांचे सहकार्य लाभले असल्याचे महेश नाना साठे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close