मंगळवेढा येथे मनसे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार – मनसे नेते दिलीप धोत्रे
शंभर रुपये पासून पाच लाखात पर्यंतची बक्षीसे देण्यात येणार

मुख्य संपादक-दिनेश खंडेलवाल
मंगळवेढा येथे मनसे “महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धा रंगणार – मनसे नेते दिलीप धोत्रे
शंभर रुपये पासून पाच लाखात पर्यंतची बक्षीसे देण्यात येणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंगळवेढा येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मनसे महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत मल्लांच्या कुस्ती या आखाड्यात होणारा असून शंभर रुपये पासून ते पाच लाखांपर्यंतच्या रुपयांचे बक्षीस कुस्त्यांसाठी ठेवण्यात आली आहेत.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा मनसेचे नेते विधानसभा उमेदवार दिलिप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की निवडणूक आल्यानंतर दिलीप धोत्रे कार्यक्रम घेतो असे नसून गेल्या दहा वर्षापासून मी कायम विविध कार्यक्रम घेत असतो. जनता साक्षीदार आहे. निवडणूक डोळ्यासमोर आणून साडी वाटणे, कोणाचे लांगुलचालन करणे, असला विषय मी कधीही करत नाही. मी काम करणारा माणूस आहे. त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही. राजकारण सोडून सर्व कुस्तीप्रेमींनी खेळ म्हणून या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना यावेळी केले.
मंगळवेढा येथे कुस्ती मैदानाच्या आयोजना वेळी गेलो असता तेथील मारुती वाकडे वस्ताद यांच्या तालमीला भेट दिली. त्या ठिकाणी दुरुस्तीचे मोठे काम होते. तत्काळ या कामाला मदत करून काम सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील ज्या ज्या तालमींची दुरुस्ती असेल अशा तालमींनी मनसे केसरी कुस्तीच्या उद्घाटनानंतर अमित ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देऊन मागणी केल्यास तन मन धन म्हणून मदत करण्याचा मनसेचा मनोदय आहे. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली लवकरच अशा तालमींना दुरुस्तीसाठी व तेथील वस्तू व साहित्यासाठी शासन स्तरावरून आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असेही मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत मनसेचे शशिकांत पाटील, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद, अरुण भाऊ कोळी, गणेश पिंपळनेरकर आदी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.