पंढरीत देशी बनावटीचे रिव्हॉल्वरसह आरोपी अटकेत
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कामगिरी
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत देशी बनावटीचे रिव्हॉल्वरसह आरोपी अटकेत
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कामगिरी
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहराच्या उपनगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी एक इसम गावठी बनावटीचे रिवाल्वर घेऊन फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदरची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीला रिवाल्वरसह ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेले इसबावी परिसरामध्ये रात्री पावणेदहाचे सुमारास एक इसम पिस्तूल घेऊन फिरत आहे. दरम्यान गुन्हे प्रतिबंधक पथक शहरांमध्ये गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की शहरातील दुध पंढरी समोर इसबावी येथे एक इसम हा त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगुन फिरत आहे.
सदर घटनेबाबत वरिष्ठांना हकीकत सांगून सदर प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाई करणेकामी पथक तात्काळ रवाना केले सदर ठिकाणी सापळा रचून संशयीत इसम योगेश मारूती खंडागळे वय-२६वर्ष, रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले. त्यास पुढील कारवाई साठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ५९४/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ / नागनाथ कदम, सपोफौ / शरद कदम, पोहेकॉ/१०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, पोहेका / ३९८ सिरमा गोडसे, पोहेका /१७८९ सचिन, हेंबाडे, पोहेकॉ/४९३नवनाथ माने पोहेकॉ/६०१नितीन पलुसकर, पोकॉ/१५१३ बजीरंग बिचुकले, पोका / २१९० समाधान माने, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१९०४ निलेश कांबळे व सायबर विभागाचे पोका / योगेश नरळे यांनी केली. दरम्यान सदर गुन्हयांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.