पंढरीतील भव्य “नोकरी महोत्सवात” ५४० तरुणांना मिळाला रोजगार
१४३९ सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा सहभाग
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीतील भव्य “नोकरी महोत्सवात” ५४० तरुणांना मिळाला रोजगार
१४३९ सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा सहभाग
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी भैरवनाथ शुगर व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नोकरी महोत्सवा मध्ये १४३९ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले. त्यापैकी तब्बल ५४० युवकांना जागेवरच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तसेच लोकल कंपन्यांमध्ये ५४० बेरोजगारांची नियुक्ती झाल्यामुळे नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांनी अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी ” भव्य नोकरी महोत्सव” चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या भव्य नोकरी महोत्सवा मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. तर ऑनलाईन एक हजार अर्ज नोंदविण्यात आले होते. विविध कंपन्या मधून चार हजार पाचशे सुशिक्षित तरुण बेरोजगार कर्मचारी लागणार असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकांस नोकरी मिळणार आहे. या नौकरी महोत्सवात पाचवी ते पदवीधर शिक्षीत तरूण तरूणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी उपलब्ध करून देऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला यामध्ये वार्षिक पॅकेज मध्ये तरुणांना सुमारे दोन लाखा पासून चार लाख रुपयांपर्यंत नोकरीचे पॅकेज मिळाले आहेत.
या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मुलाखत घेण्यात आली. कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकीचे पत्र जागेवरच देण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी अनिल दादा सावंत, संदीप मांडवे, नागेश भोसले, आदित्य फत्तेपुरकर, शाम गोगाव, एम पाटील,अमर सूर्यवंशी, संजय बंदपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.