बिझनेस

आवताडे शुगरचे पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – चेअरमन संजय आवताडे

कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस जाहीर;यंदा उसाला चांगला दर देण्याचा मानस

संपादक – दिनेश खंडेलवाल 

आवताडे शुगरचे पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – चेअरमन संजय आवताडे

कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस जाहीर;यंदा उसाला चांगला दर देण्याचा मानस

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देत शेतकऱ्यांचे समाधान केलेले आहे. यावर्षी कारखान्याने पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे प्रतिपादन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील आवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रा. लि. या साखर कारखान्याच्या तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक भारत निकम, विजय माने, बापू काकेकर, मारापुरचे सरपंच विनायक यादव, आसबे, दामाजीनगरचे माजी उपसरपंच सुहास पवार, अविनाश मोरे, श्याम पवार, येड्रावचे चंद्रकांत गोडसे, जकराया नरोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, टेक्निकल सरव्यवस्थापक सुहास शिंनगारे, आवताडे स्पिनरचे इन्चार्ज सुनील कमते, चिफ केमिस्ट मोहन पवार, दत्तात्रय भोसले, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीत शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, चीप अकाउंटंट बजरंग जाधव, एच आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, आयटी मॅनेजर रणजीत रणदिवे, स्टोर कीपर महेश इंगळे, परचेस ऑफिसर अजय सरवळे, डेप्युटी ची पिनर प्रताप मोरे, डे. चिफ केमिस्ट प्रकाश धावणे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, असिस्टंट सुरक्षा अधिकारी रणजीत पवार यांचेसह अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी २०२३-२४ या ऊस गाळप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त ऊस घातलेला आहे अशा सचिन बापूराया चौगुले, शामराव अंबाणा ढाने, दयानंद भारत दत्तू, ज्ञानेश्वर तुकाराम मुकणे, माणिक ज्ञानोबा इंगळे, बाळासाहेब गडदे, पांडुरंग माने, किसन आसबे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन व सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

चेअरमन संजय आवताडे पुढे म्हणाले, अवताडे शुगर ने शेतकरीवर्ग व कर्मचाऱ्यांच्या बळावर गेल्या वर्षी ४ लाख ४ हजार मॅट्रिक टन ऊस गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामचा पैसा मिळावा यासाठी नेहमीच कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आहे. यावर्षीही उसाला चांगला दर देण्याचा आपला मानस असून शेतकऱ्यांनी आवताडे शुगरलाच ऊस घालावा. कारखान्याचे यशात येथील कर्मचाऱ्यांचा आहे नेहमीच मोलाचा वाटा असल्याने कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close