मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे – अर्जुन चव्हाण
गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता आणि महामंडळ पोहोचवणार
संपादक – दिनेश खंडेलवाल
मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे – अर्जुन चव्हाण
गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता आणि महामंडळ पोहोचवणार
पंढरपूर(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्ह्यात गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता तयार करत असतानाच अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ मराठा बांधवांना तरुणांना झाला पाहिजे. यासाठी कार्य सुरू असून आज पांढरेवाडी येथे शाखा उद्घाटन करताना मनस्वी आनंद होत आहे. मराठा तरुणांनी आणि बांधवांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग निर्माण करावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेऊन नोकरी देणारे तयार व्हावेत अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी पांढरेवाडी येथील शाखा उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली.
प्रारंभी मराठा महासंघाच्या फलकाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली पांढरेवाडी येथे अखिल भारतीय युवक मराठा महासंघ या शाखेची उभारणी करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण पुढे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यासाठी आता नरेंद्र पाटील यांनी पंढरपुरातच अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यालय सुरू केल्याने पंढरपूर तालुक्यासह माळशिरस नातेपुते अकलूज सांगोला मंगळवेढा मोहोळ अधिभागातील मराठा समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे. या महामंडळामध्ये एक लाखापासून पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध असून याचा लाभ समाजातील तरुणांनी बांधवांनी घ्यावा त्याचबरोबर आपण नोकरी न करता आपण उद्योजक बनावे व आपल्याकडे नोकरीसाठी इतरांना संधी द्यावी अशी भूमिका पार पाडण्यासाठी आग्रह केले.
या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, विद्यार्थ्यी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, शहर रिक्षा संघटना अध्यक्ष- नागेश गायकवाड, टाकळी शाखा अध्यक्ष गणेश कदम, अनिल नगरचे आनंद शिंदे, पांढरेवाडी येथील व्यापारी तालुका उपाध्यक्ष पांडुरंग सावंत, युवक तालुका अध्यक्ष अमर शिंदे, शाखाध्यक्ष अर्जुन भोईरकर, उपाध्यक्ष रोहन फाळके, खजिनदार विश्वजीत पवार, सचिव कृष्णदेव भूईरकर, सहसचिव ज्ञानेश्वर खपाले, कार्याध्यक्ष प्रदीप जगताप,नितीन फाळके, दिगंबर खपाले, रमेश चिखलकर, बालाजी भूईरकर, लक्ष्मण भोसले, करण भूईरकर, संदीप शिंदे, आनंद साळुंखे सह पांढरेवाडी गावातील लहान थोर सर्व नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.