क्राइम

पंढरीत चोरीस गेलेली बोलेरो आरोपी सह ताब्यात

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी;२४ तासात वाहनासह आरोपी अटकेत

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत चोरीस गेलेली बोलेरो आरोपी सह ताब्यात

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी;२४ तासात वाहनासह आरोपी अटकेत

पंढरपूर(प्रतिनिधी):- तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये ग्रामीण भागातून तसेच इतर ठिकाणाहून दहाव्याचा विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बोलेरो वाहनाची चोरी सकाळी झाली याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती मिळवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले सदरचा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील असून त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३/१०/२०२४ रोजी फिर्यादी कीसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून फिर्याद दिली की फिर्यादी हे त्यांचे कुटूंबासह नातेवाईकांच्या १०व्याचे विधी करीता त्यांची बोलेरो गाडी नंबर एम एच ४५ ए ८१११ ही दिनांक – २३/१०/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा ते सकाळी ८.०० वा दरम्यान पंढरपुर येथील दत्त घाट जवळील दत्त मंदीरासमोरील बोळात लॉक करून लावलेली होती. व ते दहाव्याचा विधी करण्यासाठी चंद्रभागा वाळवंटामध्ये गेले दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संम्मत्ती वाचुन यांची बोलेरो जीप चोरून नेली असल्याबाबत फिर्याद दिल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ६६२/२०२४ भान्यासं २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वेळेचा विलंब न करता सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,पंढरपूर शहर पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवून सदर घटनास्थळी पाहिले असता सदर ठिकाणच्या व आजू बाजूच्या सी.सी.टी.व्ही फुटेजचे अवलोकन केले असता सदर फुटेजमध्ये एक इसम सदर वाहनाजवळ संशयास्पद हालचाली करून सदरचे वाहन घेवुन जात असताना दिसला.

सदर फुटेजमधील संशयास्पद इसमाबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेवून त्याची ओळख पटवून तो ज्या दिशने गेला त्याचा माग काढत गोपनीय बातमीदारांमार्फत सदर संशयीत इसमाचा व बोलेरो जिपचा शोध घेतला असता ती सांगोला नाका पंढरपुर येथे सांगोला रोडवर मिळून आल्याने सदर इसमास व सदर वाहनास ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणले. त्याचेकडे सदर गुन्हयाचा तपास केला असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले.

सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लखन कृष्णात माने वय-३०वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. वंदुर, ता. कागल, जि. कोल्हापुर असल्याचे सांगितले त्यानंतर त्याचेकडून गुन्हयात गेलेली बोलेरो जिप क्रमांक एम एच-४५ ए ८१११ ही सविस्तर पंचनाम्याने गुन्हयाचे कामी जप्त करून पुढील तपासकामी पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे यांनी ताब्यात घेतली आहे.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ / शरद कदम, सपोफौ/राजेंद्र गोसावी, पोहेकॉ/३९६ सुरज हॅबाडे, पोहेकॉ //१७३६ सचिन इंगळे, पोहेका /१७८९ सचिन हेंबाडे, पोहेकॉ/३९८ सिरमा गोडसे, पोहेकॉ/६०१ नितीन पलुसकर, पोहेकॉ/१६५७ दादा माने, पोहेका / १२५५ विभुते, पोहेकॉ/२२१ प्रसाद औटी, पोकॉ/२१९० समाधान माने, पोका /१५१३ बजीरंग बिचुकले, पोकॉ/१९०४ कांबळे, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहेका / ३९६ सुरज हेंबाडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close