विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांचा रूट मार्च
पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे, सरकोली या गावात केला रूट मार्च
संपादक – दिनेश खंडेलवाल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांचा रूट मार्च
पंढरपूर तालुक्यातील चळे, आंबे, सरकोली या गावात केला रूट मार्च
पंढरपूर(प्रतिनिधी):- विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधूमाळी येत्या काही दिवसात सुरू होणार असून यासाठी पंढरपूर तालुक्यातील संवेदनशील असलेल्या आंबे, सरकोली, चळे या गावांमध्ये पोलीस प्रशासनाकडून रुट मार्च करण्यात आला.
चळे, सरकोली व आंबे या तिन्ही गावाच्या मुख्य बाजारपेठेमधून तसेच संमिश्र वस्तीच्या ठिकाणी सायंकाळी सहा ते साडेआठ दरम्यान सदरचा रूट मार्च करून पोलिसांनी विधानसभा कालावधीमध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे याबाबत प्रत्येक ठिकाणच्या ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रूट मार्च मध्ये तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सह तालुका पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी व ३० अंमलदार त्याचबरोबर एस एस बी कंपनीचे अधिकारी व जवान यांनी सहभाग नोंदविला होता.