भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा
विकास कामाच्या जोरावर मतदार संघात वाढता पाठिंबा मिळत आहे

संपादक – दिनेश खंडेलवाल
भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमध्ये प्रचार दौरा
विकास कामाच्या जोरावर मतदार संघात वाढता पाठिंबा मिळत आहे
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान महादेव आवताडे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने एवढा तालुक्यातील खालील गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळी ८.३० वाजता हिवरगांव, ९.३० वाजता खोमनाळ, १०.१५ वाजता भाळवणी, ११.१५वाजता निंबोणी, १२.१५ वाजता चिक्कलगी, १.०० वाजता मारोळी, दुपारी ३.०० वाजता शिरनांदगी, ३.४५ वाजता सिद्धनकेरी, ४.३० वाजता जालिहाळ, सायं.५.१५ वाजता हाजापूर, ६.०० वाजता डोंगरगाव, सायं.७.०० वाजता रड्डे असा हा प्रचार दौरा संपन्न होणार आहे.
आमदार समाधान आवताडे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार समाधान आवताडे यांची भाजपा व महायुतीचे उमेदवारी घोषित केली आहे.
रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण इत्यादी मूलभूत आणि पायाभूत विकास बाबींमध्ये त्यांनी केलेले भरीव कार्य त्यांना या निवडणुकीत प्लस पॉईंट ठरणार आहे.
तरी वरील दौऱ्यासाठी संबंधित गावातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.