माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात तुतारीचे उमेदवार अनिल दादा सावंत यांचा नारळ फोडून प्रचाराचा होणार शुभारंभ
खा. धैर्यशील मोहिते- पाटील, मान्यवरांच्या हस्ते होणार प्रचाराचा शुभारंभ
संपादक – दिनेश खंडेलवाल
माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात तुतारीचे उमेदवार अनिल दादा सावंत यांचा नारळ फोडून प्रचाराचा होणार शुभारंभ
खा. धैर्यशील मोहिते- पाटील, मान्यवरांच्या हस्ते होणार प्रचाराचा शुभारंभ
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारीचे उमेदवार अनिल दादा सावंत यांचा माचणूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे. माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ संपन्न होणार आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार व भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याही प्रचाराचा शुभारंभ आज मंगळवार दुपारी चार वाजता माचणूर येथील येथील महादेव मंदिरात नारळ फोडून करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचा आमदार निवडून येत होता. शरद पवार यांच्या विचाराला मानणारा मतदार या मतदारसंघांमध्ये आहे. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील कोणती भूमिका मांडणार याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
तुतारी चिन्ह घेऊन उभे असलेले सर्वसामान्यांचे शिलेदार अनिल दादा सावंत यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याच्या जोरावर मतदान खेचून घेणार असून आपल्या उमेदवारीचे व्हीजन ते यावेळी सांगणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील मतदारांचे लक्ष प्रचाराच्या शुभारंभाकडे लागून राहिले आहे.