प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाच्या लढाई नंतर वाढली उमेदवारांची धाकधूक लागले निकाला कडे लक्ष
दुपारी तीन वाजेपर्यंत होणार निकाल स्पष्ट;कोण होणार आमदार, कोणाचा उधळणार गुलाल
संपादक – दिनेश खंडेलवाल
प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाच्या लढाई नंतर वाढली उमेदवारांची धाकधूक लागले निकाला कडे लक्ष
दुपारी तीन वाजेपर्यंत होणार निकाल स्पष्ट;कोण होणार आमदार, कोणाचा उधळणार गुलाल
विजयाच्या काठावर जाणार की विजय सर करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष
पंढरपूर(प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असतांनाच प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाच्या लढाई नंतर प्रत्येक उमेदवारांची निकालाची धाकधूक आता वाढू लागली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सुरुवातीला पोस्टल मतदानांची मोजणी केली जाईल यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या १४ टेबल वरून २५ फेऱ्यात दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊन संपूर्ण निकाल समजतील असे सांगितले जाते. तर कोण होणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा आमदार, कोणाचा उधळणार गुलाल याकडे कार्यकर्त्यांसह संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
चुरशीच्या झालेल्या लढाईनंतर आता निकालाच्या वेळी प्रत्येक उमेदवाराचा कार्यकर्ता हा गुलाल आपलाच असल्याचे सांगत असून कोण जिंकणार यावर लावलेल्या पैजा आपणच जिंकणार असल्याचे कार्यकर्त्यातून निर्विवादपणे सांगताना दिसत आहे. कोणता उमेदवार विजयाच्या काठावर जाणार आणि कोणता उमेदवार विजय सर करणार याकडे मतदार राजा सह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत जनता कोणाच्या पाठीमागे होती जनतेच्या मनातील उमेदवार कोण या विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण आणि तो किती मताधिक्याने विजयी होणार हे सर्व स्पष्ट होणार असून कार्यकर्त्यांची उत्सुकता आता निकालाच्या ठिकाणाकडे लागलेली दिसत आहे.