फडणवीस मुख्यमंत्री तर पडळकर कॅबिनेट मंत्री होण्यासाठी बहिणींचे विठ्ठलाला साकडे
चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरी पर्यंत घातले साष्टांग दंडवत
संपादक – दिनेश खंडेलवाल
फडणवीस मुख्यमंत्री तर पडळकर कॅबिनेट मंत्री होण्यासाठी बहिणींचे विठ्ठलाला साकडे
चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरी पर्यंत घातले साष्टांग दंडवत
आम्ही भगिनी प्रत्येक एकादशीला दंडवत घालत बा विठ्ठला तुझी सेवा करू
पंढरपूर(दिनेश खंडेलवाल):- राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या हालचालीला वेग आला असताना पंढरपुरात लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी तसेच कॅबिनेट मंत्रीपदी गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागावी यासाठी नामदेव पायरी समोर उभे राहून आम्ही भगिनी प्रत्येक एकादशीला दंडवत घालत तुझी सेवा करू असे बा विठ्ठलाला साकडे घातले आहे.
महायुती सरकारला जनतेने भरभरून आशीर्वाद देत एक हाती सत्ता दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी बहिणी यांनी आज पवित्र चंद्रभागेत स्नान करून ओल्या कपड्यानीशी चंद्रभागेच्या पात्रामधून साष्टांग दंडवत घालत नामदेव पायरी पर्यंत येऊन विठ्ठलाला साकडे घालत आपली इच्छा व्यक्त केली.
यावेळी विश्रांतीताई भुसनर यांनी दंडवत घातले तर सिमा भुसनर, जयश्री साळुखे,कौसल्या निळे, माऊली भाऊ हळणवर , सोमा ढोणे,प्रसाद कोळेकर,विक्रम तरंगे यांनी
“पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय” आदि घोषणा देत त्यांना प्रोत्साहन करत त्यांच्यासोबत उपस्थतीत होते.
नामदेव पायरी समोर आल्यानंतर विश्रांती ताई भुसणर म्हणाल्या की बा विठ्ठला माझे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गोपीचंद पडळकर हे कॅबिनेट मंत्री होऊ दे देवेंद्र फडणवीस यांनी महिला व शेतकर्यां साठी केलेले काम व गोपीचंद पडळकर लढत असलेले बहुजनांची लढाई त्यांच्या या कार्याला बळ मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणे व गोपीचंद पडळकर कॅबिनेट मंत्री होणे गरजेचे आहे. तरच आमच्या बहुजनांच्या महिलांना न्याय मिळेल महिला भगिनी सुरक्षित राहतील विठ्ठलाने एवढा आर्शिवाद द्यावा आम्ही भगिनी प्रत्येक एकादशीला दंडवत घालत तुझी सेवा करू असे साकडे बा विठ्ठलाला घालून निच्छय व्यक्त केला.