ईतर

पंढरीत चालत्या कार ने घेतला पेट;वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला

बघ्यांची गर्दी अन् वाहतूक कोंडी;पोलीस प्रशासनाने वाहतूक केली सुरळीत

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत चालत्या कार ने घेतला पेट;वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला

बघ्यांची गर्दी अन् वाहतूक कोंडी;पोलीस प्रशासनाने वाहतूक केली सुरळीत

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूरातील व्हीआयपी समजला जाणार्या रस्त्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास एका चालत्या कारमधून अचानक धूर निघू लागले व पाहता पाहता कारला आग लागली चालती कार रस्त्यावरच पेटल्याने वाहन धारकात गोंधळ उडाला आणि वाहतूक जाम झाली. मात्र प्रसंगावधान राखून आग विझवल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही व वाहनाचेही मोठे नुकसान झाले नाही.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी पंढरपूर कराड रोड वरून पंढरपूरहुन कराड कडे उपनगरात जाणारी एक पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच १३/सी एस ३०६७ सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वे ग्राउंडच्या समोरील बाजूस येताच रस्त्यावर पेट घेतल्याने वाहनधारकातून एकच खळबळ उडाली होती. आपल्या वाहनाला आग लागली असल्याचे समजताच संबंधित कारचालकाने कारमधून बाहेर येऊन आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांना विनंती करत प्रयत्न केला.

दरम्यान या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेचे डिव्हायडर वर असलेल्या झाडाला पाणी घालणारे पाण्याचे ट्रॅक्टर पंढरपूर शहराकडे निघाले असता तेथील कर्मचाऱ्यांनी आग लागल्याचे पाहून सदरील पांढऱ्या कारची आग विझवण्यासाठी पाण्याचा पाईप धरुन फवारा सुरू केला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावून आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला पाहणाऱ्याला कारमध्ये कोण आहे का याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु कार मध्ये वाहन चालका व्यतिरिक्त कोणीही नव्हते व वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टाळला.

पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन कारला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून कार रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी पोलीस प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close