पंढरपूर तालुक्यात डाळिंबाच्या बागेत सापडली गांजाची झाडे पोलीस पथकाची कारवाई शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
२६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा २ लाख ६३ हजार ४२७ रुपयेचा मुद्देमाल जप्त
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर तालुक्यात डाळिंबाच्या बागेत सापडली गांजाची झाडे;पोलीस पथकाची कारवाई शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
२६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा २ लाख ६३ हजार ४२७ रुपयेचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील उंबरगावच्या एका शेतकऱ्याने आपल्या डाळिंबाच्या बागेत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाची बेकायदेशीर झाडांची अनधिकृतपणे लागवड केल्याने त्या ठिकाणी पोलिस पथकाने कारवाई करत सुमारे २६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा ज्याची बाजारभावाने २ लाख ६३ हजार ४२७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैद्य धंदेवाल्यांसह शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले अधिक माहिती अशी पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे राजेंद्र कालिदास पवार याचे शेतात डाळिंबाच्या बागेमध्ये बेकायदेशीर पणे गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली.
सदरच्या माहितीची खातर जमा करून त्या ठिकाणी कारवाईसाठी पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहर व ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. गोपनीय खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचल्यानंतर त्यांनी राजेंद्र कालिदास पवार याचे शेतातील डाळिंबाचे बागेत जावून बारकाईने पाहणी केली असता तेथे ठिकठिकाणी ७ फुट ते ४ फुट उंचीची गांजाची झाडे लावलेली दिसुन आली. त्याठिकाणी एकुण १४ झाडे असलेचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान सदर आरोपी राजेंद्र कालिदास पवार याने मौजे उंबरगाव ता. पंढरपूर येथील आपले वहिवाटीत व कब्जेत असलेल्या जमीनीतील गट नं १८६ मध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधीत असलेला वरील वर्णनाचा २५ किलो ७६८ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे व ३४८ ग्रॅम सुका गांजा असा एकंदर २६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किं. रू. २ लाख ६३ हजार ४२७ रू. चा मादक उग्र वासाचा प्रतिबंधीत गांजा बेकायदेशीर अनधिकृतपणे लागवड केलेला मिळून आला. सदर ओला तसेच सुका गांजा गुन्हयाचे तपासकामी जप्त करून आरोपी राजेंद्र कालिदास पवार रा. उंबरगाव ता. पंढरपूर याचे वर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि भारत वाघे, सपोफौ विजय गायकवाड, शरद कदम, पोहवा. सुरज हेंबाडे, पोना सचिन इंगळे, पोशि माने, पोसई संजय राउत, नेम पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे, पोशि पाटील, पोशि मिसाळ नेम. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केली आहे.
पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन केलेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून यापूर्वीही पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यात खळबळ उडाली असल्याचे समजते.