ईतर

विठ्ठलाचे दर्शन होणार सुखकर टिसीएस कंपनीकडून टोकण दर्शन प्रणालीला मान्यता – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने शिर्डी व शेगाव देवस्थानचा अभ्यास दौरा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

विठ्ठलाचे दर्शन होणार सुखकर टिसीएस कंपनीकडून टोकण दर्शन प्रणालीला मान्यता – सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने शिर्डी व शेगाव देवस्थानचा अभ्यास दौरा

पंढरपूर(प्रतिनिधी):- श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या भाविकांचे सुलभ, वेळेत व सुखकर दर्शन व्हावे यासाठी तिरूपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकण दर्शन पध्दती राबविण्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करून देण्याबाबत टिसीएस कंपनीला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर सदर कंपनीने मोफत संगणक प्रणाली विकसित करून देण्याचा प्रस्ताव मंजुर केला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व मंदीर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वार कामाचा आढावा घेऊन कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत अशा सुचना पुरातत्व विभाग व संबधित ठेकेदारास देण्यात आल्या. तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर मालमत्ता अधिकारी नियुक्त करणे, श्री क्षेत्र आळंदी येथे मंदिर समितीसाठी जागा उपलब्ध करून घेणे, सन २०२५ मधील श्रींच्या पुजा ऑनलाईन बुकींग करणे, रक्षक सिक्युरिटी कंपनी विषयी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना अंतिम नोटीस देणे, मंदिरातील निर्माल्यापासून धुप – अगरबत्ती तयार करणेबाबत थर्ड वेव्ह टेक्नॉलॉजीज, पुणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कार्यावाही न केल्याने प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड, पंढरपूर यांचा प्रस्ताव योग्य त्या अटी व शर्तीवर मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

दरम्यान अनंत अरूण माळवदकर, गुरूदत्त अभिमन्यू क्षिरसागर, संकेत अशोक कोले, स्नेहा अमोल वाडेकर इत्यादी कर्मचा-यांना अनुकंपा तत्वावर मंदिर समितीमध्ये नोकरी देऊन नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास येथील उपहारगृहाचे भूमिपूजन करण्यात आले व दैनंदिनी २०२५ चे प्रकाशन देखील करण्यात आले. तसेच कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने विविध संगणक प्रणाल्या टिसीएस कंपनीकडून मोफत उपलब्ध करून घेणे व महाराष्ट्र राज्यातील शिर्डी व शेगांव देवस्थाने ही प्रसिध्द देवस्थाने आहेत. या देवस्थान मधील कार्यालयीन कामकाज, कामकाजासाठी केलेल्या अत्याधुनिक साधनांचा वापर, भाविकांना देण्यात येणा-या सेवा सुविधांची माहिती घेण्यासाठी मंदिर समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचा-यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close