सामाजिक

कोर्टी रोडवर सिंहगड कॉलेज व नर्सिंग इन्स्टिट्यूट रस्त्यावर स्पीड ब्रेकर,लाईट नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण

अंधारातील रहदारीने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका;शहीद टिपू सुलतान युवक संघटनेची मागणी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

कोर्टी रोडवर सिंहगड कॉलेज व नर्सिंग इन्स्टिट्यूट रस्त्यावर स्पीड ब्रेकर,लाईट नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण

अंधारातील रहदारीने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका;शहीद टिपू सुलतान युवक संघटनेची मागणी

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरापासून नजीक असलेल्या कोर्टी रोडवरील हॉटेल प्रितम ढाबा ते सिंहगड कॉलेज व लाईफ लाईन नर्सिंग इन्स्टिट्यूट या रस्त्यावर लाईटचे डांब आहेत मात्र त्यावरील लाईट बंद असल्याने अंधारात रहदारी सुरू असते शैक्षणिक ठिकाण असल्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अंधारातील रहदारीने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोकाही संभवतो संबंधित प्रशासनाने या ठिकाणी असलेल्या खांबावरील लाईट तात्काळ सुरू करावी अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमिर तांबोळी यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

कोर्टी रोड वरील फुट रस्ता येथे स्पीडब्रेकर आहे. मात्र सिंहगड कॉलेज व लाईफ लाईन नर्सिंग इन्स्टिट्यूट समोर स्पीड ब्रेकर नाही तसेच लाईट सिग्नल नसल्याने भरधाव वेगाने वाहने येतात विद्यार्थी व विद्यार्थीनी है रस्त्यावर येत असताना अचानक वाहनाचा अपघात होवून एखाद्या विद्यार्थ्यास जीव गमवावा लागू शकतो.

शासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज परिसरात कॅमेरे बसविण्याचे आदेश देत आहे. त्याची काही ठिकाणी अंमलबजावणी होत आहे. मात्र कोर्टी रोडवर असलेल्या टाकळी बायपासला सुरक्षेसाठी बसविण्यात आलेला कॅमेरा बंद आहे का? याची तपासणी करण्यात यावी, कॅमेरा बंद असेल तर तो तात्काळ सुरू करण्यात यावा. याच बायपासवर लाईटदेखील बंद असल्याने अंधार पसरलेला आहे. समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या ठिकाणहून विद्यार्थी, विद्यार्थीनीं त्यांचे पालक व परिसरातील नागरिक ये जा करीत असतात लाईट बंद असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष्य देणे आवश्यक आहे. अशी मागणी शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी,अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन,मुख्याधिकारी नगरपरिषद,अभियंता विद्युत वितरण कंपनी,ग्रामसेवक कोर्टी ग्रामपंचायत यांचेकडे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close