क्राइम

पंढरीत साधूने दाखवली अफलातून किमया; पत्रकारासह एकाची लूट

हम तुम्हारे गुरु है म्हणत सोन्याच्या अंगठीसह रोख रक्कम लांबवली

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत साधूने दाखवली अफलातून किमया; पत्रकारासह एकाची लूट

हम तुम्हारे गुरु है म्हणत सोन्याच्या अंगठीसह रोख रक्कम लांबवली

पंढरपूर(प्रतिनिधी):- कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या एका साधूने पंढरपूर नजीक एका मठाच्या समोर गाडी थांबवत “हम तुम्हारे गुरु है” असे म्हणत बोलण्याच्या खा अफलातून कामगिरीने किमया दाखवत एका पत्रकारासह वीट भट्टी कामगाराला लुटल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भटुंबरे हद्दीतील संत जनार्दन स्वामी महाराज मठासमोर एक साधू उभा होता. दरम्यान भटुंबरे गावातील आपल्या घराकडून पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे हे आपल्या शेताकडे कामानिमित्त निघाले असताना त्या साधूला पाहून त्यास मदत करावी अशी इच्छा झाल्याने ती त्याच्यासमोर थांबले व त्यांनी आपल्या खिशातील दहा रुपये काढून साधूला चहा पिण्यासाठी दिले दरम्यान याचवेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाची ईरटीका कार येऊन थांबली या कारमधून साधूच्या वेशातील व्यक्ती खाली उतरून नजीक येऊन हम तुम्हारे गुरु है तुम हमे पहचानते नही क्या असे हिंदी मधून बोलू लागला मुझे सौ रुपये चाहिये तुम्हारा सब अच्छा होगा तुमको दुवा लगेगी असे म्हणत असताना च ईरटीका गाडीतील अजून दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले हरिभाऊ प्रक्षाळी यांनी आपल्या जवळील शंभर रुपये काढून त्यांना दिले परंतु संबंधित साधने आपल्या बोलण्याची अफलातून किमया दाखवत प्रक्षाळे यांच्या हातातील सोन्याची साडेआठ ग्रॅम वजनाची अंगठी किंमत ४० हजार रुपये काढून घेत त्यांच्या खिशातील ३५०० असे ४३ हजार पाचशे रुपये काढून घेतले. घर जाओ बच्चा असे म्हणून त्यांनी प्रक्षाळे यांना घराकडे जाण्यास सांगितले काही वेळानंतर हरीभाऊ प्रक्षाळे यांना आपण लुटलो गेलो असल्याचे लक्षात आले.

घटनास्थळी पुन्हा येऊन सदरचे वाहन कुठे दिसते का हे पाहत असतानाच त्या ठिकाणी वीट कामगार उभा होता त्यालाही साधूने आपली किमया दाखवली होती सदर वेट कामगाराला तेरे पीछे जेब मे पैसा है हमे देदो तेरा कल्याण होगा असे म्हणत त्याच्याकडील तेराशे रुपये काढून घेऊन साधू मार्गस्थ झाले. झाल्या प्रकाराची चर्चा परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली.

सदर घटनेबाबत प्रक्षाळे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन साधूच्या वेशातील अज्ञात तीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गावडे हे करत आहेत.

सध्या कुंभमेळा असल्याने अनेक साधुसंत कुंभमेळ्यासाठी जात असतात परंतु नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close