सामाजिक

संत चोखोबारायांचे संपूर्ण जीवन भक्ती, समतेचे प्रतिक

वैशाख वद्य पंचमी सुदीन प्रयाण करी चोखा

संपादक – दिनेश खंडेलवाल 

संत चोखोबारायांचे संपूर्ण जीवन भक्ती, समतेचे प्रतिक

वैशाख वद्य पंचमी सुदीन प्रयाण करी चोखा

पंढरपूर(प्रतिनिधी):- वारकरी संप्रदायातील महान संत, संत नामदेवरायांचे लाडके शिष्य आणि समतेचे प्रतीक संत चोखोबाराय महाराज यांची पुण्यतिथी वैशाख वद्य पंचमी रोजी साजरी करण्यात आली. पंढरपूरात पार पडलेल्या या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

संत चोखोबारायांचे संपूर्ण जीवन हे भक्ती, समता आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक ठरले. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यात संत नामदेवरायांचा ठाम पाठिंबा सदैव लाभला. “धन्य धन्य नामदेव माझा” अशा शब्दांत चोखोबारायांनी आपली गुरुभक्ती व्यक्त केली होती.

चोखोबारायांच्या निधनानंतर संत नामदेवरायांनी त्यांच्या अस्थी मंगळवेढ्याच्या वेशीवरून गोळा करून पंढरपूरच्या विठोबा मंदिराच्या महाद्वारी समाधी बांधली. ‘प्रथम चोखोबा मग विठोबा’ असा दंडक घालून त्यांनी चोखोबारायांना अभूतपूर्व सन्मान दिला. तत्कालीन ऐतिहासिक समाधी सोहळ्याला संत चोखोबारायांचे कुटुंबीय – संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका महाराज, संत कर्ममेळा – हेही उपस्थित होते. “महादवारी चोखा तयाची बहीण, घाली लोगण उभयतां” अशा ओळींमध्ये संत निर्मळाबाईंनी या सोहळ्याची भावना व्यक्त केली आहे.

आजही वारकरी पंढरपूरात विठोबा दर्शनाआधी संत चोखोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतात. या परंपरेला अनुसरून यावर्षीही पंढरपूरात संतप्रेमी भाविकांनी चोखोबारायांच्या समाधीला अभिवादन केले. या सोहळ्याला चिंतामणी सर्वगोड, अभिमन्यु सर्वगोड, रामदास सर्वगोड, गणपत सर्वगोड, ज्ञानोबा सर्वगोड, किरण सर्वगोड, रवी सर्वगोड, कृष्णा सर्वगोड, संगम सर्वगोड, स्वप्नील कांबळे, सुरज साखरे, सुशांत सर्वगोड, अमोल सर्वगोड, संग्राम माने आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close