
संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरीत खंडेलवाल केमिकल तर्फे अन्नदान व फराळ वाटप
हजारो वारकरी भाविकांनी घेतला फराळाचा लाभ यंदाचे ६ वे वर्ष
पंढरपूर(प्रतिनिधी):- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक वैष्णव भागवत भक्त पंढरपूर मध्ये दाखल होतात. पंढरपुरात आल्यानंतर वारकरी भाविकांना मोफत अन्नदान व फराळाचे वाटप खंडेलवाल केमिकलचे मयूर उर्फ राघवेंद्र खंडेलवाल यांचे वतीने करण्यात येते.
गुलाब बाबा महाराज पंढरपूर यात्रा दिंडी क्रमांक २६१ यांचे प्रमुख ह भ प श्री सोमनाथ पाटील (देहू), भाऊसाहेब कदम, श्री बालकिसन खंडेलवाल, सौ. पुष्पा खंडेलवाल,सौ. सीमा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. पंढरपूर शहराच्या मध्यभागी असलेले गौरक्षण येथे खंडेलवाल केमिकलचे वतीने गेल्या पाच वर्षापासून वारकरी भाविकांना मोफत अन्नदान व फराळाचे वाटप करण्यात येते.
चांगल्या प्रतीचे व उच्च दर्जाचे नायलॉन साबुदाणा चिवडा ,गोड व तिखट बटाटा चिवडा, बटाटा वेफर्स, राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू आदी खाद्यपदार्थांची व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे बॉटल वाटप करण्यात येत असल्याने वारकरी भाविकातून त्यांचे कौतुक केले जाते. सदर फराळाचे सेवन केल्यानंतर वारकरी भाविकातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले जात होते.
देवशयनी एकादशी दिवशी केलेल्या मोफत फराळ वाटपामध्ये हजारो वारकरी भाविकांनी लाभ घेतला हे कार्य पूर्ण करण्यासाठी अनुराधा येळे,स्नेहा सिंदोल, गुरु थिटे, श्रीकेश खंडेलवाल, शुभम खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना राघवेंद्र खंडेलवाल म्हणाले की माझे वडील बालकिसन खंडेलवाल हे गेल्या अनेक वर्षापासून देहू ते पंढरपूर पायी वारी करत आहेत. वारीमध्ये ठिकठिकाणी त्यांना मोफत अन्नदान व इतर व्यवस्था सर्वसामान्य नागरिकाकडून मिळते परंतु पंढरपुरात आल्यानंतर आपणही ही सेवा सुरू करावी असा मानस बोलून दाखवला व भावना व्यक्त केल्याने गेल्या पाच वर्षापासून मी खंडेलवाल केमिकल मार्फत पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना मोफत अन्नदान व फराळ वाटप सुरू केले. यावर्षी माझा लहान भाऊ शुभम खंडेलवाल देखील पायी वारीत सहभागी झाल्याने वारकरी संप्रदायाची वारी परंपरा घराण्यात पुढे चालू झाली आहे.