
संपादक – दिनेश खंडेलवाल
मुजम्मील कमलीवाले ‘राष्ट्रीय आयकाॅनीक अशोका अवॉर्ड 2025’ ने सन्मानित
आयकाॅनीक पीस अवॉर्ड कौन्सिल’ कडून दिल्ली येथे प्रदान
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने आपल्या सोबत पंढरपूरचे नाव दिल्लीत पोहोचवले कारणही तसेच होते. समाजसेवा, मानवतेची सेवा आणि धार्मिक सलोखा यासाठी झटणारे येथील युवा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना ‘आयकाॅनीक पीस अवॉर्ड कौन्सिल’ कडून ‘राष्ट्रीय आयकाॅनीक अशोका अवॉर्ड 2025’ ने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य आणि उत्साही पुरस्कार समारंभात त्यांना हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशभरातून निवडक व्यक्तींना गौरवण्यात आले, ज्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मानवाधिकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामध्ये मुजम्मील कमलीवाले यांची निवड ही त्यांच्या निरंतर आणि निःस्वार्थ सामाजिक कार्यामुळे करण्यात आली.
मुजम्मील कमलीवाले यांनी मागील काही वर्षांत भावनेतून विविध उपक्रम राबवले आहेत. गरिबांना अन्नदान, बेवारस आणि आजारी वृद्धांसाठी रुग्णसेवा, हिंदू-मुस्लिम ऐक्य उपक्रम तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रांत त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांनी समाजसेवक म्हणून सामाजिक कामातूनच सुरुवात केली आणि आज ते स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत.
समाजासाठी काहीतरी चांगलं करणं हेच माझं ध्येय आहे. हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे.” या पुरस्काराच्या निमित्ताने पंढरपूर, सोलापूर आणि महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विविध सामाजिक संस्था, पत्रकार संघटना, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुजम्मील कमलीवाले हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.