ईतरसामाजिक

पंढरपूरात पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धेला नागरिक,मंडळांचा,उस्फूर्त प्रतिसाद

११६ स्पर्धकांचा सहभाग; मूल्यमापनासाठी तज्ञ परीक्षकांची ५ पथके

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूरात पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धेला नागरिक, मंडळांचा,उस्फूर्त प्रतिसाद

११६ स्पर्धकांचा सहभाग; मूल्यमापनासाठी तज्ञ परीक्षकांची ५ पथके

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपरिषद आणि शहर पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या वतीने “पर्यावरण पूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महिला भगिनी, गणेश मंडळे, तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच टाकाऊ पासून टिकाऊ, सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर यासाठी मुख्यता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

सजावट स्पर्धेत एकूण ११६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या सर्जनशीलतेला वाव देत अत्यंत आकर्षक, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक देखावे साकारले. स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व तज्ञ परीक्षकांची ५ स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. सदर पथकांनी घरोघरी भेटी देत पर्यावरण पूरक मूर्ती आणि सजावट,प्लास्टिक, थर्माकोलमुक्त सजावट, टाकाऊ पासून टिकाऊ, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि डस्टबिनचा वापर या आधारे गुणांकन करून परीक्षण केले.

या स्पर्धेत जनावरांविषयी माणुसकीचा संदेश देणारा भावनिक देखावा कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीची गोष्ट, आपल्या प्रथा, परंपरा व संस्कारांना अधोरेखित करणारा. “मराठी सण साजरे करा -आपला पारंपरिक वारसा जपा, भक्ती व समर्पण यांचे दर्शन घडवणारा पांडुरंग भक्त गोरा कुंभाराचा जिवंत देखावा, श्री. विठ्ठल-रुक्मिणी पंढरपूर प्रमुख चार यात्रा पारंपरिक देखावा, केदारेश्वर मंदिर हरिश्चंद्रगड, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पारंपरिक वाडे, जीवनशैली, चालीरीती व परंपरा देखावा, जेजुरीचे खंडोबा मंदिर आदी उल्लेखनीय आणि सामाजिक संदेश देणारे देखावे होते.

या उपक्रमासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे, प्रशासकीय अधिकारी श्री बोडरे, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close