क्राइम

पंढरीत जुगार अड्ड्यावर शहर पोलीसांची कारवाई

८ आरोपीं सह ५ लाख ३३ हजार ४६० रू चा मुद्देमाल केला जप्त

        संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत जुगार अड्ड्यावर शहर पोलीसांची कारवाई

८ आरोपीं सह ५ लाख ३३ हजार ४६० रू चा मुद्देमाल केला जप्त

पंढरपूर(प्रतिनिधी):- तिर्थक्षेत्र पंढरीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून यावर लगाम बसावा म्हणून पोलिसांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम आखली आहे. या अंतर्गत जुगार अड्ड्यावर कारवाई सुरू केली असून काही दिवसांपूर्वी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. आजही अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत पोलिसांनी ८ आरोपीं सह ५ लाख ३३ हजार ४६० रू चा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पंढरपूर शहरातील जुनिपेठ या भागातील साठे नगर येथे नागेश यादव हा स्वतःच्या घरामध्ये अवैध जुगाराचा अड्‌डा चालवित आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कांबळे यांना सदरची माहिती सांगुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथका मार्फत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि कारवाई केली.

सदरची कारवाई नागेश प्रकाश यादव याचे राहते घराचे वरती एका खोलीमध्ये करण्यात आली. त्याठिकाणी काही इसम अवैध जुगार खेळत असल्याने सदर अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे ८ इसम ५२ पत्याचा तिरट नावाचा जुगार पैशाची पैज लावुन खेळत असताना दिसले. त्यांना जागीच पकडुन पोलीस ठाणेस आणुन त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी आरोपींकडे एकुण २ दुचाकी, १ चार चाकी असे ३ वाहने, ५ मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५ लाख ३३ हजार ४६० रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या घटनेची पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६२८/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधि. कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कारवाई केलेल्या इसमांची नावे नागेश प्रकाश यादव वय. २५ वर्षे, रा साठे नगर, सुरज प्रकाश यादव वय. ३५ वर्षे, रा. साठे नगर, साहिल रशीद तांबोळी वय. २३ वर्षे रा. आंबेडकर नगर, पंढरपूर, दिपक उत्तम यादव वय. ४१ वर्षे, रा. शेगाव दुमाला ता. पंढरपूर, अनिल साधु डिसले वय. ५४ वर्षे, रा. अनवली ता. पंढरपूर, गोदुराम दत्तु खिलारे वय. ३५ वर्षे, रा. व्यासनारायण झोपडपटटी पंढरपूर, भोला शेखर अभंगराव वय. २२ वर्षे, रा. जुनी पेठ कोळी गल्ली पंढरपूर,नारायण एकनाथ वाघ वय. ३८ वर्षे, रा. गोविंदपुरा ता. पंढरपूर

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. बसवराज शिवपुजे, मंगळवेढा उपविभाग, (अतिरीक्त कार्यभार पंढरपूर उपविभाग पंढरपूर), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोह सिरमा गोडसे, पोह विठ्ठल विभुते, पोह प्रसाद औटी, पोह सचिन हेंबाडे, पोना सचिन इंगळे, पोकॉ कपिल माने, पोशि शहाजी मंडले, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close