शैक्षणिक

स्वेरी मध्ये डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाचा कॅप राऊंड-१ येत्या बुधवार पासून सुरु

दि. ४ ऑक्टोबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया

संपादक – दिनेश खंडेलवाल 

स्वेरी मध्ये डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाचा कॅप राऊंड-१ येत्या बुधवार पासून सुरु

दि. ४ ऑक्टोबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) येत्या बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार असून त्याची प्रक्रिया शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे.

स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६५०५) मध्ये कॅप राउंड-१ साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. स्वेरीच्या पहिल्या डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाला प्रचंड गर्दी होत असल्यामुळे आणि पालकांच्या मागणीनुसार मागील तीन वर्षांपासून अर्थात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसी महाविद्यालयांतर्गत ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेने नवीन डी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा डी.टी.ई. कोड- ६३९७ असा आहे. याठिकाणी देखील कॅप राउंड १ चे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

सन २०२५-२६ मध्ये पदविका फार्मसी अर्थात डी. फार्मसी प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चिती करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता येत्या बुधवार दि. १ ऑक्टोबर पासून ते शनिवार दि.४ ऑक्टोबर पर्यंत प्रवेशाची पहिली फेरी (कॅप राउंड-१) चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश संख्या, विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेचे निकाल, अभ्यासासाठी सोय-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा.

विद्यार्थ्यांनी यासाठी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. या कॅप राउंडच्या चार दिवसात घेतलेला निर्णय हा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या पहिल्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. डी. फार्मसी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.इ.) कक्षाच्या संकेतस्थळावर बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्विकृती सोमवार, दि. ८ ते बुधवार दि.१० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान करता येणार आहे.

प्रथम वर्ष डी.फार्मसीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. एस.व्ही मांडवे (मोबा.क्र. ९९२१७६२७२८), प्रा. वृणाल मोरे (मोबा.क्र. ९६६५१९६६६६) प्रा.एस.व्ही कौलगी (मोबा.क्र. ७०५७६२३५५३) व प्रा. विकास देशमुख (मोबा.क्र. ९१७२९२१२५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. सतीश मांडवे व प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू शिक्षकांच्या सहकार्याने सदर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. डी.फार्मसीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या दोन्ही महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close